शिंदे गटाला मोठा धक्का ! 400 जण ठाकरे गटाच्या वाटेवर?
ठाकरे गटातील आमदार , खासदार, नगसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळं ठाकरे गटाला गळती लागली असून अनेक भागात ठाकरे गटाला मोठे भगदाड पडले असताना, आता शिंदे गटात ही मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शिंदे गटातील ४०० जण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळं शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई - राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या हालचाली आणि घडामोडी घडत आहेत. जून २०२२ मध्ये शिंदे गटानं बंड केल्यानंतर भाजपासोबत सरकार स्थापन केले. यानंतर मागील महिन्यात अजित पवार हे सत्तेत सहभागी होत, उपमुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात टाकून घेतली. राज्यातील सत्तातंरानंतर शिंदे गट व ठाकरे गट हे अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. ठाकरे गटातील आमदारा, खासदार, नगसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळं ठाकरे गटाला गळती लागली असून अनेक भागात ठाकरे गटाला मोठे भगदाड पडले असताना, आता शिंदे गटात ही मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शिंदे गटातील ४०० जण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळं शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
४०० जण राजीनामा देण्याच्या तयारीत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अनेक शाखांमध्ये विभागप्रमुखांकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय, अशी माहिती समोर आली आहे. आमच्या विधानसभा क्षेत्रात गत 2-3 महिन्यांपासून सिद्धेश कदम यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देत छळ करण्यास सुरुवात केली आहे. त्याला कंटाळून आम्ही राजीनामा देत आहोत, असं कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिवसेना विभागप्रमुख विकास गुप्ता म्हणाले. तर जोगेश्वरीत विभाग क्रमांक 4 चे प्रमुख विजय धिवार व महिला विभागप्रमुख शिल्पा वेले यांच्या छळामुळे आम्हाला आत्महत्या करावी वाटत आहे, अशी संतप्त भावना शाखा संघटकांनी बोलून दाखवली आहे.
.तर शिंदे गटाला मोठे भगदाड
शिंदे गटाच्या बंडानंतर शिंदे गटात जोरदार इंनकमिंग सुरु होते. तर ठाकरे गटात आऊटगोईंग सुरु होते. परंतू आता शिंदे गटातून आऊटगोईंगला सुरु होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतील बंडाळीला 1 वर्ष झाले आहे. या कालावधीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आले आहे. शाखा क्रमांक 77 मधील जवळपास 200 पदाधिकारी, तर जोगेश्वरीतील जवळपास 400 पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती शाखाप्रमुख प्रकाश शिंदे यांनी दिली. जर चारशे जणांनी राजीनामा दिला तर, शिंदे गटाला मोठे भगदाड पडेल, असं बोललं जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.