Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाटबंधारे विभागात भरती सुरू; पगार दरमहा 40 हजार रूपये




मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या रिक्त पदांकरिता भरतीप्रक्रिया सुरु झाली असून त्यासंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागात भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले असून १७ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्ज सादर करायचे आहेत.
या पदभरती मध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण दहा
जागांसाठी ही पदभरती असणार आहे, सदर नेमणुकी करता लागू असलेल्या अटी शर्ती तसेच अर्जच नमुना माननीय मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे मंगळवार पेठ, बाणेर रोड, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच हा अर्ज कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग सांगली यांच्या कार्यालयातून संबंधित उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे उपलब्ध असेल.


कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली, वारणाली, विश्रामबाग, सांगली - ४१६ ४१५ येथे अर्ज सादर करावेत, करार पद्धतीवर नेमणुकी करता अर्ज करतेवेळी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे वय ३१ जुलै २०२३ रोजी ६३ वर्षापेक्षा जास्त नसावे तसेच अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदासाठी अर्ज केले आहे त्या पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे असेल.


अर्जदाराने आपल्या वैयक्तिक माहिती त्यांचा ईमेल, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक असेल. तसेच मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ सांगली व कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली यांचे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास ४० हजार रुपये पर्यंत मानधन दरमहा दिले जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.