Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकही सुट्टी न घेता 27 वर्षे नोकरी; गिफ्ट म्हणून मिळाला कप आणि पेन; त्यानंतर लेकीन अस काही की झाला करोडपती!

एकही सुट्टी न घेता 27 वर्षे नोकरी; गिफ्ट म्हणून मिळाला कप आणि पेन; त्यानंतर लेकीन अस काही की झाला करोडपती!


कोणतंही काम प्रामाणिकपणे केलं, तर त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतेच. त्यामुळे तुमच्या कामावर तुम्ही प्रेम केलं पाहिजे; ज्यातून काहीतरी चांगली गोष्ट घडेल. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. ही घटना अशी की, एका बर्गरच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीनं २७ वर्षांपासून एकही सुट्टी न घेता काम केलं. पण, कंपनी आणि सहकाऱ्यांनी मिळून त्यांना भेट स्वरूपात ज्या वस्तू दिल्या, त्या खूपच निराशाजनक होत्या. त्यामध्ये कँडी, पेन, स्टारबक्स कप यांसारख्या वस्तूंचा समावेश होता. पण त्या छोट्या भेटवस्तूंनंतर त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडेल याची त्यांनी कधी कल्पनाच केलेली नव्हती

‘बर्गर किंग’मध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याचं नाव केविन फोर्ड, असं आहे. तो अमेरिकेतील लास वेगास येथील रहिवासी आहे. फोर्डनं २७ वर्षं नोकरीच्या काळात एकही दिवस सुट्टी न घेता काम केलं. त्यानंतर कंपनीकडून मिळालेल्या त्या छोट्या भेटवस्तूंचा एक व्हिडीओ केविनने सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, त्यानंतर वडिलांनी घेतलेली मेहनत पाहून ते खरोखर एका मोठ्या गोष्टीसाठी पात्र आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांची मुलगी सेरीना हिनं GoFundMe नावाची एक मोहीम सुरू केली.

या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मोहिमेद्वारे फोर्डच्या नावावर ४,१८,००० (३८ कोटी) रुपयांची देणगी जमा झाली. फोर्डसाठी राबविल्या गेलेल्या मोहिमेला मिळालेला पाठिंबा पाहून हे स्पष्ट झाले की, खरोखर ते यासाठी पात्र आहेत. फोर्ड हे लास वेगासमधील इंटरनॅशनल एअरपोर्टवर बर्गर चेनमध्ये एक लाइन कूक आणि शेफ होते. ते केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर कॉलेजच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठीही काम करीत होते.

एकल पिता म्हणून फोर्ड यांनी जवळपास तीन दशकांपूर्वी आपल्या दोन मुलींचा ताबा मिळवला होता. मग त्यांनी दुसरं लग्न केल्यावर त्यांचं कुटुंब वाढलं. त्यामुळे मुलांना आधार देण्यासाठी ते नोकरीत काम करीत राहिले आणि भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या हेतूनं त्यांनी मेहनत घेतली.

यावेळी त्यांच्यासाठी मुलीनं सुरू केलेल्या मोहिमेनं बड्या व्यक्तींसह अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांना मोहिमेतून मिळालेली रक्कम ही त्यांच्या २७ वर्षांच्या कामातील यशाचं प्रतीक आहे. ही देणगी कोट्यवधीच्या घरात होती. त्यामुळे फोर्डच्या कुटुंबाला सामान्य लोकांच्या उदारतेचं आश्चर्य वाटलं; जे त्यांच्या अपेक्षांपेक्षा जास्त होतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.