चॉकलेट, पैशाचे अमिष दाखवून पाच वर्षाच्या चिमूकलीवर अत्याचार; आरोपीला 20 वर्षाची शिक्षा
इस्लामपूर : पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आकाश सुभाष पवार (घाटनांद्रे, ता.कवठेमहांकाळ)याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. बालिकेला पैसे व चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केला होता.
२०२० मध्ये घडलेल्या घटनेचा गुन्हा कोकरूड (ता. शिराळा) पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक दोन) राजश्री परदेशी यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोप सिद्ध झाल्याने वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व आठ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.पिडितेतर्फे सरकारी वकील राजेश मडके यांनी काम पाहिले. आठ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी सुनील जाधव, तपासी अधिकारी डी. बी. कदम यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. पैरवी अधिकारी चंद्रकांत शितोळे, पोलिस सुनंदा निकम, पी. जी. आपटे यांचे सहकार्य मिळाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.