Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सव्वा कोटींचा एक टन गांजा केला नष्ट, सांगलीतील 11 पोलीस ठाण्यातील 45 गुन्हातील जप्त केला होता गांजा

सव्वा कोटींचा एक टन गांजा केला नष्ट,  सांगलीतील 11 पोलीस ठाण्यातील 45 गुन्हातील जप्त केला होता गांजा 


सांगली जिल्ह्यातील 11 पोलीस ठाण्यांत 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला एक कोटी 20 लाखांचा एक टन 205 किलो 322 ग्रॅम गांजा नष्ट करण्यात आला. पलूस तालुक्यातील एका कंपनीत अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. न्यायालयासह पोलीस दलातील अन्य विभागांची परवानगी घेऊन कारवाई करण्यात आली. हा गांजा हा 1998 ते 2022 या कालावधीत जप्त करण्यात आला होता.


सांगली जिल्हा पोलीस दलाने गेल्या काही वर्षांमध्ये गांजासह अमली पदार्थांवर मोठय़ा प्रमाणात कारवाई केली होती. वेगवेगळ्या 11 पोलीस ठाण्यांकडील 'एनडीपीएस' ऍक्ट लागवड, वाहतूक, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या गुह्यांतील सन 1998पासून ते सन 2022पर्यंतचा मुद्देमाल हा केंद्रीय अमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा करण्यात आला होता. अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे याबाबत पाठपुरावा करून हा मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जप्त गांजाबाबत न्यायालयात व पोलीस ठाण्यात पाठपुरावा करून 11 पोलीस ठाण्यांतील 45 गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश प्राप्त केले. तसेच दहशतवादविरोधी पथकाचे महासंचालक, सीआयडी, पुणे व विविध केंद्रीय यंत्रणा यांची परवानगी घेतली. शासननिर्णयाप्रमाणे जिह्यात 'अमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी' स्थापन केली. या कमिटीच्या परवानगीने हा गांजा नष्ट करण्यात आला.

या प्रक्रियेमध्ये जत पोलीस ठाण्याकडील 13, उमदी 5, मिरज 6, महात्मा गांधी चौक 5, सांगली शहर 7, सांगली ग्रामीण 2, विटा 3, कासेगाव 1, तासगाव 1, कवठेमहांकाळ 1, मिरज ग्रामीण 1 अशा वेगवेगळया 11 पोलीस ठाण्यांकडील 45 गुह्यांतील एक टन 205 किलो 322 ग्रॅम वजनाचा एक कोटी 20 लाखांच्या गांजाचा समावेश होता. या प्रक्रियेत आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रासायनिक विश्लेषक, कोल्हापूर, वैधमापनशास्त्र विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.