चक्क! पुण्यातील डॉक्टरांनी महिलेच्या पित्ताशयातील काढले तब्बल 1000 खडे!
एका महिलेच्या ओटीपोटात सारखं दुखत होतं. डॉक्टरांनी तपासणीनंतर या महिलेच्या पित्ताशयातून थोडेथोडके नाही तर तब्बल 1000 हून अधिक खडे (स्टोन्स ) काढले. ते स्टोन्स काढण्यासाठी पुण्यातील डॉक्टरांनी केवळ 20 मिनिटांची लॅपरोस्कोपिक कोलोसिस्टेक्टोमी केली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 30 वर्षीय महिलेला गरोदरपणात ओटीपोटात तीव्र वेदना होत होत्या आणि तपासणी केल्यावर तिच्या पित्ताशयाला छिद्र पडलेले आढळले. गर्भधारणा आणि येऊ घातलेल्या प्रसूतीमुळे डॉक्टरांनी तिचे उपचार पुढे ढकलले होते.डॉ. शशांक शाह हे अग्रगण्य लॅप्रोस्कोपिक आणि बॅरिअॅट्रिक सर्जन आहेत. त्यांनीच या महिलेची सर्जरी केली होती.
ते म्हणाले, "सोनोग्राफीने तिच्या पित्ताशयाच्या बाहेरील भागामध्ये (ज्याला सिस्टिक डक्ट म्हणतात) मोठ्या प्रमाणात स्टोन्स जमा झाले होते. ती वेदनेने मोठ्याने ओरडायची आणि खूप त्रास व्हायचा. यामुळे तिच्या पित्ताशयात डिस्टेंशन आणि अस्वस्थता निर्माण झाली होती." डॉ. शाह म्हणाले की ही शस्त्रक्रिया वेदनादायी नव्हती आणि ती महिला रुग्ण तिच्या बाळाला सहजपणे स्तनपान करू शकते."तपासणीनंतर, तिने फक्त तीन पंक्चरसह लॅपरोस्कोपिक कोलोसिस्टेक्टॉमी केली आणि ही प्रक्रिया 20 मिनिटांत संपली. ती सर्जरी वेदनामुक्त होती आणि शस्त्रक्रियेनंतर 20 तासांच्या आत तिला डिस्चार्ज देण्यात आला. तसेच ती तिच्या बाळाला स्तनपान करू शकते. या महिलेच्या पित्ताशयात 1 ते 2 मिमी हिरवे-पिवळे स्टोन्स होते. ते कोलेस्टेरॉलमुळे बनलेले होते.
ती आता बरी आहे आणि कोणत्याही अडचणींशिवाय तिचं जीवन जगत आहे," असं डॉ. शाह म्हणाले. गॉलस्टोन्स म्हणजेकाय?गॉलस्टोन्स म्हणजेच पित्ताशयातील खडे हे पाचक द्रवामुळे तयार होतात. पोटाच्या उजव्या बाजूला एक लहान नाशपातीच्या आकाराचा अवयव आहे. पित्ताशयामध्ये पित्त नावाचा पाचक द्रव असतो, जो लहान आतड्यात सोडला जातो.नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या मते, पित्ताशयातील स्टोन्स वाळूच्या दाण्याएवढे लहान ते गोल्फ बॉलएवढे असू शकतात. डॉक्टरांच्या मते, पित्ताशयातील स्टोन्स अत्यंत वेदनादायक असतात आणि त्यासाठी सर्जरी करावी लागते.गॉलस्टोन्सची लक्षणं व संकेतसहसा तळलेले पदार्थ आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर पित्ताशयात वेदना होतात.- शरीराचं तापमान वाढणं आणि ताप-हृदयाचे ठोके वाढणं-त्वचा पिवळी पडणं आणि डोळे पांढरे होणं-त्वचेवर खाज सुटणं- अतिसार- थंडी वाजणं- गोंधळणे, चक्कर येणं- भूक न लागणेगॉलस्टोन्स कशामुळे होतात?- आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गॉलस्टोन्स होण्याचे खरं कारण पित्ताशयातील पित्ताचे केमिकल असंतुलन असते.- याशिवाय जास्त कोलेस्टेरॉलमुळे पिवळे कोलेस्टेरॉल स्टोन होऊ शकतात, जे तुमच्या यकृताने जास्त कोलेस्ट्रॉल बनवल्यास तयार होतात.- लाल रक्तपेशींच्या सामान्य ब्रेकडाऊनवेळी तयार होणारे बिलीरुबिन केमिकल यकृतातून जाते आणि शेवटी शरीरातून बाहेर टाकले जाते. जेव्हा पित्ताशय बिलीरुबिन अॅक्सेस तोडण्यास सक्षम नसते तेव्हा गॉलस्टोन्स तयार होतात. ते अनेकदा गडद तपकिरी किंवा काळे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.