Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आपली मान काळीकुट्ट दिसतेय ? 1 सोपा उपाय ,15 मिनिटांत निघेल मानेवरचा काळपटपणा





आपला चेहरा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी लोक काहीही करतात. चेहऱ्याच्या सुंदरतेकडे लक्ष देत असताना अनेकांचे मानेकडे दुर्लक्ष होते. घाम, धूळ आणि माती मानेवर जमा झाल्यास ते क्लिन करणं कठीण होतं.

मानेवर मळ जमा होत गेला की काळे थर दिसून  एकदा हे काळे डाग मानेवर चिकटून राहीले तर बरेच उपाय करून ही निघत नाहीत. मानेचा काळेपणा चुटकीसरशी दूर करण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. या उपायाचा एक फायदा असा की पार्लरमध्ये तासनतास न घालवता फक्त १५ मिनिटांत मान स्वच्छ करता येते. 

इंस्टाग्रामवरbeauty__secrets_with_shalini नावाच्या पेजवरून स्किन केअर हॅक शेअर केला आहे. ज्यात एक महिला आपली काळी पडलेली मान १५ मिनिटांत क्लिन करताना दिसत आहे. हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी एलोवेरा घ्यावं लागेल. एलोवेराला मधोमध कापून त्यावर अर्धा चमचा हळद. अर्धा चमचा कॉफी पावडर, अर्धा चमचा साखर आणि लिंबू लावून मानेवर चोळा. पूर्ण मानेवर आणि पाठीवर रगडून १५ मिनिटांनी कोमट पाण्यानं स्वच्छ करा. 

सोशल मीडियावर काळी मान चमकवण्याचा हा उपाय वेगानं व्हायरल होत आहे. यात सांगण्यात आलं आही की आठवड्यातून ३ वेळा जर तुम्ही हा उपाय केला तर चांगले परिणाम दिसून येतील. इतकचं नाही तर हा घरगुती उपाय लहान मुलांसाठी गुणकारी ठरेल.
१) मानचा काळेपणा दूर करण्यासाठी १ चमचा तुरटी पावडरमध्ये एक चमचा मुल्तानी माती मिक्स करा. त्यानंतर यात १ चमचा गुलाब पाणी घाला. याच १ ते २ चमचे लिंबाराच रस मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट लावल्यानंतर १५ ते २० मिनिटांसाठी तसेच राहू द्या. सुकल्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवा.

२) एका वाटीत तुरटी, बेकींग सोडा आणि गुलाब पाणी एकत्र करा हे मिश्रण मानेला लावा आणि १० मिनिटांनी धुवून टाका.

३) एक चमचा लिंबाच्या रसात एक चमचा मध मिसळा. ही पेस्ट मानेला लावा १५ ते २० मिनिटांनी ओल्या टॉवेलनं चेहरा स्वच्छ पुसा.

४) एका भांड्यात एक चमचा बेसन घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. ही पेस्ट गडद मानेवर चांगली लावा आणि 10 ते 15 मिनिटे राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने धुवा.

५) एका भांड्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात बटाट्याचा रस आणि एक चमचा गुलाबपाणी घाला. हे सर्व मिसळून पेस्ट तयार करा आणि 15 ते 20 मिनिटे मानेवर लावलेली राहू द्या, कोरडे झाल्यानंतर स्वच्छ करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.