Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई-पुण्यात NIA आणि पोलिसांची मोठी कारवाई; 5 ठिकाणी टाकला छापा

मुंबई-पुण्यात NIA आणि पोलिसांची मोठी कारवाई; 5 ठिकाणी टाकला छापा

मुंबई : NIA आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त टीमने आज मुंबई आणि पुण्यात चार ठिकाणी छापेमारी  केली आहे. देशातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सकाळपासून ही कारवाई सुरु आहे. या कारवाईमध्ये ISIS शी संबंधित चार व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. 2021 च्या सुरुवातीपासून हे चारही जण NIA च्या रडारवर होते. आता त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या घरातून डिजिटल उपकरणांस साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

या प्रकरणी पुण्यातील झुबेरला ताब्यात घेण्यात आले. झुबेर ISIS शिमोगा कर्नाटक मोड्यूलशीसोबत काम करत असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. अजूनही NIA आणि पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्यामुळे पुण्यात पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.