Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेत डॉ. अशोक सकळे व डॉ. नरेंद्र खाडे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार

कर्मवीर पतसंस्थेत डॉ. अशोक सकळे व डॉ. नरेंद्र खाडे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार



सांगली : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित.. सांगली चे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे व तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे यांचा ७५ वा वाढदिवस संस्थेत साजरा करुन त्यांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अशोक सकळे व डॉ. नरेंद्र खाडे यांनी आपल्या कृतीतून कर्मवीर पतसंस्थेसाठी मोलाचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे व तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे यांना संस्थात्मक कामाचा चांगला अनुभव आहे. कमी बोलणे व प्रत्यक्ष कार्य तडीस नेणे हा या दोघांचा स्थायीभाव आहे. अत्यंत निर्गर्वी व्यक्तीमत्व लाभलेले या दोघांनी आयुष्यामध्ये अनेक आडचणीना तोंड दिले पण ते कायमपणे खंबीर राहिले. त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. समाधान हा या दोघांच्यामध्ये आढळणारा दुर्मिळ गुण आहे. त्यामुळे ते आयुष्यात समाधानी आहेत. अशा भावना संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केल्या.

यावेळी डॉ. अशोक आण्णा सकळे व डॉ. नरेंद्र आनंदा खाडे यांना पुष्पगुच्छ देवून त्यांना पुढील सुखी संपन्न आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संचालक अँड एस. पी. मगदूम, श्री. ओ. के. चौगुले (नाना) श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. रमेश ढबू यांनी मनोगत व्यक्त करुन या प्रदिर्घ प्रवासातील निखळ मैत्रीच्या अनेक आठवणी सांगून जुन्या मैत्रीला उजाळा दिला. यावेळी सचिन सकळे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी या दोन सत्कारमुर्ती कडे इतरांचे सुख चिंतन्याची भावना नेहमी दिसल्याचे नमुद केले.

यावेळी सत्कारास उत्तर देताना दोन्ही सत्कार मुर्तीनी आयुष्यामध्ये चांगले मित्र लाभल्यामुळे आयुष्यात चांगले कार्य करता आले व आयुष्य सत्कारणी लागल्याचे सांगितले. जीवनामध्ये कार्य करीत असताना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून कार्य केल्यामुळे मान सन्मान मिळाले. त्यातून कार्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कर्मवीर पतसंस्थेने केलेला सत्कार हा घरचा सत्कार असून तो आयुष्यातील संस्मरणिय क्षण आहे असे सांगुन जीवनात ज्याचे प्रेम लाभले त्यांचे ऋण व्यकत केले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके). संचालिका श्रीमती भारती आप्पासो चोपडे . तज्ञ संचालक श्री. लालासो भाऊसो थोटे यांचे सह सत्कारमुर्तीचे नातेवाईक मित्र व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.