Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

३८ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

३८ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास


सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील पांडूरंग ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने चोरी केली. या चोरीत ३८ लाख ८९ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी एका चोरट्याविरोधात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वळसंग येथे यशवंत महारूद्रप्पा चाकूर (वय ५३, रा. वळसंग, ता. द. सोलापूर) यांच्या मालकीचे पांडूरंग ज्वेलर्स दुकान आहे. नेहमीप्रमाणे चाकूर हे आपले ज्वेलर्सचे दुकान बुधवारी रात्री बंद केले. गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने दुकानाच्या चॅनेल गेटचे कुलूप तोडून ज्वेलर्स दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. यात मंगळसुत्र, नेकलेस, जोडवे, सोन्याच्या अंगठ्या, मणीमंगळसुत्र, पैंजण, बोरमाळ, लॉकेट असे विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. चोरट्याचा तपास वेगाने ग्रामीण पोलिस करीत आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सनगल्ले हे करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.