Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलानेच केली वडिलांची हत्या!

मुलानेच केली वडिलांची हत्या!


वडील वारंवार रागवत असल्याचा राग डोक्यात ठेवून मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना अंधेरीत घडली. समद शेख असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी नोमाद शेखला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली समद हे अंधेरी पूर्वच्या शीतलादेवी ट्रान्झिस्ट पॅम्प येथे कुटुंबीयांसोबत राहत होते. ते वाहनचालक म्हणून काम करत होते. त्यांचा मुलगा नोमाद हा काम करत नसायचा. समद हे नोमादला काम कर असे सांगत असायचे. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असायचे. काही दिवसांपूर्वी नोमाद आणि समद यांच्यात वाद झाला होता. नोमादला घराबाहेर काढले होते. शुक्रवारी नोमाद हा घरी आला. त्याच्या आईने दरवाजा उघडला.

घरी आल्यावर नोमाद आणि समद यांच्यात पुन्हा वाद झाला. जुना राग डोक्यात ठेवून नोमादने समदच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. लोखंडी रॉड मारल्याने समद हे जखमी झाले. त्यांना कूपर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री समदचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच डी. एन. नगर पोलीस घटनास्थळी आले. समदच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नोमादविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. हत्येनंतर पळून गेलेला नोमाद हा अंधेरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नोमादला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.