Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतापजनक प्रकार ! एच आय व्ही ग्रस्त मुले शाळेत आली म्हणून ग्रामस्थांनी लावले टाळे

संतापजनक प्रकार !  एच आय व्ही ग्रस्त मुले शाळेत आली म्हणून ग्रामस्थांनी लावले टाळे


महाराष्ट्राला लाजवणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. एचआयव्हीग्रस्त मुलं शाळेत नको म्हणून बीडच्या पाली गावातील पालकांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पालकांनी थेट जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकत जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. बीड तालुक्यातील पाली गावात इन्फंट इंडिया या एचआयव्ही बाधितांवर काम करणाऱ्या संस्थेतील मुले शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेत येत होती.

या मुलांमुळे आमच्या मुलांना धोका होईल या भीतीपोटी पालकांनी शाळा बंद केली आहे. या मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा अशी मागणी केली आहे. एचआयव्ही बाधित मुलांचा शिक्षणासाठीचा वनवास काही केल्या संपत नाही. HIV हा आजार संसर्गजन्य नाही, याबाबत वारंवार जनजागृती करुनही बीडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात थोडं तणावाचं वातावरण आहे. याबाबत आता स्थानिक प्रशासन काय कारवाई करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.