Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा माहिती अधिकारी पदी संप्रदा बीडकर रुजूसांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात.... वर्षा पाटोळे

जिल्हा माहिती अधिकारी पदी संप्रदा बीडकर रुजूसांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात.... वर्षा पाटोळे

सांगली दि. 4:  जिल्हा माहिती अधिकारी सांगली या पदाचा कार्यभार आज संप्रदा बीडकर यांनी स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तर मावळत्या जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची सातारा येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर बदली झाल्याने त्यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज निरोप देण्यात आला.  यावेळी  माहिती अधिकारी एकनाथ पोवार, जिल्हा माहिती कार्यालयातील अमोल पाटील, शंकरराव पवार, सुधीर पाटील, बन्सीलाल मांडवे, नागेश वरूडे, प्रदीप थोरात उपस्थित होते.

नूतन जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी यापूर्वी सांगली येथे माहिती अधिकारी तसेच प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले आहे.  त्यांनी माहिती अधिकारी म्हणून डहाणू, कोल्हापूर तर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड, सोलापूर येथे काम केले आहे. शासकीय सेवेपूर्वी श्रीमती बीडकर यांनी ई टी व्ही हैद्राबाद, लोकमत पुणे, तरुण भारत सांगली, युवा सकाळ कोल्हापूर येथेही विविध पदांवर कामकाज केले आहे. 

सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात... वर्षा पाटोळे

सांगलीत काम करण्याचा वेगळा अनुभव मिळाला. प्रसिद्धी विषयक काम करताना लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. सांगलीत पाच वर्षे काम करता आले याचा आनंद मोठा आहे. सांगलीत काम करत असताना सर्वच  घटकांनी दिलेली साथ अविस्मरणीय असून सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील, अशी भावना मावळत्या जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पाटोळे यांनी मनोगत व्यक्त करताना केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.