Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाहनचालकांना नवे 'स्मार्ट कार्ड'; चालू महिन्यापासून ड्रायव्हिंग लायसन्स

वाहनचालकांना नवे 'स्मार्ट कार्ड'; चालू महिन्यापासून ड्रायव्हिंग लायसन्स

पुणे:  राज्यात लवकरच ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रांसाठी (आरसी) नवीन 'स्मार्ट कार्ड' उपलब्ध केले जाणार आहेत. सध्या जुन्या स्मार्ट कार्डसची कमतरता आहे. त्यावर तक्रारी वाढल्या होत्या. आता परिवहन विभागाने कर्नाटकातील “दी एमसीटी कार्ड अँड टेक्‍नॉलॉजी प्रा.लि.’कंपनीशी करार केला आहे.

नवीन स्मार्ट कार्डसच्या निर्मितीसाठी नवीन पॉली कार्बोनेट स्मार्ट कार्डमध्ये लेझर प्रिंट असल्याने जुन्या स्मार्ट कार्डवरील माहिती अस्पष्ट होण्याची समस्या दूर होणार आहे. यापूर्वी, पॉलिव्हिनाइल क्‍लोराइटपासून (पीव्हीसी) बनवलेल्या कार्डसवरील शाई घर्षणाने पुसली होती. परंतु नवीन कार्डावरील प्रिंट बराच काळ टिकून राहील, असा दावा केला जात आहे.

हैदराबाद येथील स्मार्ट कार्ड पुरवठादार “रोस्मर्टा’ कंपनीसोबतचा करार संपुष्टात आल्याने स्मार्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाला आहे. या विलंबामुळे स्मार्ट कार्डची गरज असलेल्या नागरिकांना अंदाजे एक ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नियोजित वेळेनुसार नवीन स्मार्ट कार्डचे वितरण सुरू होईल, असे आरटीओ विभागाने सांगितले. या अद्ययावत स्मार्ट कार्डसची छपाई विशेषत: पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन शहरांमध्ये केली जाईल.

दररोज 45 हजार कार्डस

नवीन स्मार्टकार्ड हे जागतिक दर्जाचे असून ते दीर्घकाळ टिकतील. नागपूर, पुणे आणि मुंबई केंद्रांवरून दररोज सुमारे 45 हजार स्मार्ट कार्ड वाहतूक विभागाला प्राप्त होतील, असे नियोजन करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.