Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फ्रान्समधील हिंसाचार रोखण्यासाठी योगीना पाठवा !

फ्रान्समधील हिंसाचार रोखण्यासाठी योगीना पाठवा !


फ्रान्समध्ये आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही. हजारोंच्या संख्येत आंदोलक रस्त्यावर उतरले असून, संतप्त जमावाने अनेक गाड्या आणि इमारतींना आग लावली आहे. आंदोलकांनी पोलिस स्टेशनही जाळल्याची परिस्थिती आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस गेल्या 72 तासांपासून जळत आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

फ्रान्समध्ये सीएम योगी सलग चार दिवस सुरू असलेल्या दंगलींदरम्यान, जर्मनीतील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ प्रोफेसर जॉन कॅम यांनी ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, "फ्रान्समध्ये सुरू असलेल्या दंगलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी, भारताने योगी आदित्यनाथ यांना पाठवले पाहिजे. ते 24 तासांत परिस्थिती नियंत्रणात आणतील. हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर विविध प्रकारे कमेंट करत आहेत.

आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी फ्रेंच पोलिसांनी अश्रुधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. मंगळवारी ट्रॅफिक चेकिंगदरम्यान १७ वर्षीय नाहेलच्या हत्येचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेने देश हादरला असून लोक प्रचंड संतापले आहेत. या घटनेनंतर फ्रान्समध्ये हिंसक निदर्शने उसळली असून ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. कालही लोकांचा विरोध सुरूच होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंदोलकांनी क्लिची-सॉस-बोईसच्या उपनगरातील सिटी हॉल आणि ऑबरविलियर्समधील बस डेपोला आग लावली. ते म्हणाले की पॅरिसच्या अनेक भागात लोकांच्या गटांनी सुरक्षा दलांवर फटाके फेकले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.