Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीने सोबत झोपण्यास दिला नकार; पतीने जीवच घेतला

पत्नीने सोबत झोपण्यास दिला नकार; पतीने जीवच घेतला

रांची 01 जुलै : एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या केली. या हत्येचं कारण जाणून तुम्हीही हादरून जाल. झाशीच्या प्रेमनगर येथील बिजौली भागात 24 जून रोजी झालेल्या महिलेच्या हत्येचं गूढ उकलताना पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. आरोपी संजीव राईकवार याने पत्नी रेखाचा चाकूने भोसकून खून केला होता. खून केल्यानंतर आरोपी दिल्लीला पळून गेला होता. तिथून गुपचूप परतत असताना पोलिसांना सुगावा लागल्यावर त्याला ललितपूर रोडवरून पकडण्यात आलं. आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी केली आहे.

आरोपी संजीवने सांगितलं की, त्याने मोबाईल फोन सोबत घेतला नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याचं ठिकाण शोधता आलं नाही. पत्नी रेखाचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचंही आरोपीने चौकशीदरम्यान सांगितलं. ती त्या तरुणासोबत अनेकदा फोनवर बोलत असे. यामुळे पतीने तिचा मोबाईल फोडला आणि फेकून दिला. तिला फोनवर बोलण्यास मनाई केली मात्र तिने ऐकलं नाही. त्यामुळे आरोपीला राग आला होता.

तो म्हणाला, रात्रीच्या जेवणानंतर त्याला पत्नीसोबत झोपायचं होतं. पण पत्नी तयार नव्हती. या प्रकरणाचं रुपांतर भांडणात झाल्याने त्याने रागाच्या भरात तिच्यावर चाकूने वार केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की, संजीवचे आणखी एका महिलेसोबतही संबंध होते. रेखाने त्याला विरोध केला. यावरून दोघेही वाद घालत असत. त्यामुळे रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं. जिथून त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. परिसरातील लोकांचं म्हणणं आहे की, अवैध संबंधांमुळे हे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.