Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा माहिती अधिकारीपदी संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारीपदी संप्रदा बीडकर


सांगली : जिल्हा माहिती अधिकारीपदी संप्रदा बीडकर यांची नियुक्ती करण्यात आली. वर्षा पाटोळे यांची सातारा येथे जिल्हा माहिती अधिकारी 'पदावर बदली झाली आहे. जिल्हा माहिती अधिकारी पाटोळे या तब्बल पाच वर्षे सांगली जिल्ह्यात कार्यरत होत्या. त्यांची सातारा येथे त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली. पाटोळे २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या महापुराच्या कालावधीत सांगली शहर आणि जिल्ह्याच्या काही गावांमध्ये बोटीतून जावून माहिती संकलन केली होती. 

या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत कार्याबद्दलची सखोल माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवली. संप्रदा बीडकर सांगलीमध्ये माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. २०१९ मध्ये त्यांची पदोन्नतीने बीडला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली होती. त्यानंतर सांगलीमध्ये पुन्हा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.