Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सीजीएसटी, केन्द्रीय उत्पादन शुल्कात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कंपनीत भारत पेट्रोलियम अव्वल

सीजीएसटी, केन्द्रीय उत्पादन शुल्कात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कंपनीत भारत पेट्रोलियम अव्वल 


भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या आघाडीच्या महारतन आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीला मुंबई झोनसाठीच्या सीजीएसटी (सेंट्रल गुड्स आणि सेवा कर) आणि उत्पादन शुल्कात उत्पन्नाचे भरीव योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

जीएसटी दिन साजरा करण्याच्या निमित्तान मुंबईत झालेल्या एका शानदार समारंभात हा प्रतिष्ठित सन्मान कंपनीला बहाल करण्यात आला. बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री जी. कृष्णकुमार आणि वित्त संचालक व्हीआरके गुप्ता यांनी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री रमेश बैस यांच्याकडून प्रशस्तीपत्रक आणि प्रशंसा फलक स्वीकारले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री जी. कृष्णकुमार म्हणाले, 'मुंबई झोनमधील सीजीएसटी आणि उत्पादन शुल्कासाठी लक्षणीय उत्पन्नाचे योगदान देणारी कंपनी म्हणून बीपीसीएलचा करण्यात आलेला सन्मान देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देण्यात कंपनी निभावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची दखल घेणारा आहे.' सातत्याने करपूर्ती करत आणि सरकारच्या उत्पन्नासाठी भरीव योगदान देत बीपीसीएलने कॉर्पोरेट नागरिकत्वाची जबाबदारी निभावली आहे तसेच देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लावला आहे.

सरकारने जारी केलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अमलबजावणीनिमित्त १ जुलै रोजी जीएसटी दिन साजरा केला जातो. ही केंद्र सरकारने अमलात आणलेल्या महत्त्वाच्या कररचनांपैकी एक आहे. या सर्वसमावेशक कर यंत्रणेमुळे भारताची अर्थव्यवस्था आणि उद्योगक्षेत्रात घडून आणलेल्या क्रांतीकारी प्रभावाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

कर पालनात बीपीसीएलने केलेली अतुलनीय कामगिरी आणि उत्पन्न निर्मिती यावरून कंपनीचे दमदार आर्थिक व्यवस्थापन व न्याय्य व्यावसायिक पद्धती दिसून येतात. यामुळे गुणवत्ता, नाविन्य आणि देशाच्या हितासाठी योगदान देणारी उर्जा क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी म्हणून बीपीसीएलचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.