Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शरद पवार यांचं नाव शकुनी मामा म्हणून लिहिलं जाईल"

"महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शरद पवार यांचं नाव शकुनी मामा म्हणून लिहिलं जाईल"

सोलापूर : राष्ट्रवादी हा पक्ष नाही ही टोळी आहे. अलीबाबा आणि चाळीस चोर अशी यांची अवस्था आहे. महाराष्ट्राचा राजकारणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवार यांचा नाव शकुनी मामा म्हणून लिहिला जाईल, असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र डागलंय. तसंच पहाटेचा शपथविधी अन् शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवरही सदाभाऊ खोत यांनी भाष्य केलंय.

राज्यपाल राजवट उठवण्यासाठी अजित दादाला शपथ घेण्यासाठी शरद पवारांनी पाठवल हे मी सोलापुरात बोललोच होतो. त्यानंतर परवा त्यांनी खरं सांगितलं मी गुगली टाकली होती, हे महान क्रिकेटपटूच आहेत. महाराष्ट्रचा राजकारणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवार यांचा नाव शकुनी मामा म्हणून लिहिला जाईल, असं सदाभाऊ म्हणालेत.

मी बोललो की झेंडे नाचवत आंदोलन करतात, पण मागील 60-65 वर्षात या देशातील पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या सर्वांना तुम्ही जबाबदार आहात, असं म्हणत पवारांवर सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र डागलंय. 25 किलोमीटर परिसरात एका पेक्षा जास्त कारखाने असतील तर ऊसाच्या कांडीवरून भाव देतील. हे कारखानदार अतिशय हुशार आहेत. प्रत्येक पक्षात यांची लोकं आहेत.सत्ता कोणाची पण येऊ दे हे गडी आहेतच. या सर्वांचा ब्रेन कोण आहे? बारामतीकर… आदरणीय पवार साहेब, जाणता राजा… ते खरंच जाणता आहेत म्हणून आपलं सगळं हाणतायेत.

राष्ट्रवादी हा पक्ष नाही ही टोळी आहे. अलीबाबा आणि चाळीस चोर सहकारी कारखाना बंद पडला की लगेचच घेतात, बंद पण हेच पडतात आणि खासगी करून हेच चालवतात. सहकारीमधून खासगीकरण केलेले शरद पवार यांच्या ताब्यात जवळपास 50 कारखाने आहेत. स्वर्गात जाताना खालूनवर नेता आलं असतं या जातीने खाली काहीच ठेवलं नसतं, नेता येतं नाही म्हणून जमलंय, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं मी एवढ्यासाठी कौतुक करतो की हा पहिला पठ्या मिळाला की याची गुगली बी उडवली, बॅट बी घेतली, स्टंपा बी घेतल्या आणि यांचा बॉल पण गेला, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.