Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली: अल्पवयीन मुलीचा पित्याकडून खून

सांगली: अल्पवयीन मुलीचा पित्याकडून खून


सांगली: नात्यातील मुलाशीच प्रेमसंबंधात गुंतलेल्या अल्पवयीन मुलींचा चाकूने भोसकून खून करण्याचा प्रकार मंगरूळ (ता. खानापूर) येथे घडला असून या प्रकरणी मुलीच्या पित्यास विटा पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी, श्रेया संतोष जाधव (वय १७) हिचे नात्यातीलच कार्वे (ता. खानापूर) येथील तरूणाशी प्रेमसंबंध होते. यामुळे वडिल संतोष जाधव यांनी तिचे महाविद्यालयीन शिक्षणही थांबवले होते. मात्र, मुलगी महाविद्यालयाला जाण्याचा हट्ट करीत होती. 

यासंदर्भात शनिवारी घरात मुलीची आई, वडील हे मुलीशी चर्चा करीत होते. वडिलांनी मुलाला भेटायचे नाही, त्याच्याशी संपर्क ठेवायचा नाही तरच महाविद्यालयाला जाण्यास परवानगी दिली जाईल असे सांगत होते, तर आईने अद्याप लग्नाचे वय नाही, वय पूर्ण झाल्यानंतर त्याच्याशी लग्न लावून देण्याची तयारीही दर्शवली. मात्र, मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. यातून वाद झाल्यानंतर वडिल संतोष जाधव यांनी भाजी चिरण्याचा चाकू घेऊन मुलीवर वार केले. यात ती ठार झाली. या प्रकरणी मृत मुलीची बहिण किरण जाधव हिने विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीसांनी संशयिताला अटक केली असल्याची माहिती निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.