Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुराच्या पाण्यात गेला वाहून; रात्र काढली झाडावर बसून

पुराच्या पाण्यात गेला वाहून; रात्र काढली झाडावर बसून 


सागंली : राज्यातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. यात सांगली जिल्ह्यात देखील पाऊस  झाल्याने नदीला पूर आला होता. सांगलीच्या  शिराळा तालुक्यातील लादेवाडी येथील बाजीराव खामकर हा गुरुवार (२७ जुलै) रात्री उशिरा काखे मांगले वारणा नदीवरील पुलावरून पुरात वाहून गेला. सुदैवाने तो झाडाला अडकला व रात्रभर तेथेच बसून होता.

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील नदीतील पाण्याचा प्रवाह जलदगतीने असल्याने बाजीराव खामकर हा पाण्यातून वाहून गेला. बुडत्याला काटीचा आधार या म्हणीप्रमाणे त्याला एका झाडाचा आधार मिळाला आहे. आणि तो रात्रभर नदीच्या मधोमध असणाऱ्या झाडावर जाऊन बसला. रात्र त्याने अशीच जागून काढली.सकाळ झाली व वाचविण्यासाठी याचना सकाळी परिसरातील शेतकरी शेतात जात असताना त्याने पुराच्या पाण्यात अडकल्याचे ओरडून सांगितले. ही बातमी गावात पसरताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांची नदी काठावर एकच गर्दी झाली. सध्या घटनास्थळी शिराळा  तहसीलदार, शिराळा पोलीस, तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित असून त्याला सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.