Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मी खंबीर आहे.नव्याने उभं करू' शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया

'मी खंबीर आहे.नव्याने उभं करू' शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया 


मुंबई : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींचा अक्षरश: चिखल झालेला बघायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात आता तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार हे देखील उपुमख्यमंत्री असणार आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुजबळ यांच्यासह हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे हे आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेत नाही. पण या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाहीय. शरद पवार यांची या घडामोडींवरील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शरद पवार यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. 'महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही', असं संजय राऊत यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.

शरद पवार यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

शरद पवार यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे. याच कार्यालयात शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यात संवाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांच्या पुणे कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीकडूनही अधिकृत भूमिका जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जे आमदार आज शपधविधी घेत आहेत तसेच सत्तेत सहभागी होत आहेत त्यांची ती वैयक्तिक भूमिका आहे. पक्षासोबत या घडामोडींचा काहीच संबंध नाही, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.