Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बैलाच्या अंगावर ' आम्ही साहेबांच्यासोबत ' ची कलाकारी शेतकऱ्याचे पवार प्रेम

बैलाच्या अंगावर ' आम्ही साहेबांच्यासोबत ' ची कलाकारी शेतकऱ्याचे पवार प्रेम 


बेंदूर सणाचे औचित्य साधून एका शरद पवार  प्रेमींने बैलाच्या अंगावर 'आम्ही साहेबांच्या सोबत'ची कलाकारी केली आहे. सांगली  जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवेमधील शेतकऱ्याने ही कलाकारी केली आहे. महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विविध ठिकाणाहून लोक शरद पवार यांना पाठिंबा देत असून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

वाळवा तालुक्यातील तांबवे गावच्या बैलप्रेमींनी बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलांच्या अंगावर रंगरगोटीद्वारे आम्ही साहेबांच्या सोबत आहोत असे लिहिले आहे. मजकुराची आणि बैलांची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे. वाळवा तालुक्यातील आनंदराव गावडे यांनी काल (3 जुलै) बेंदुर सणाच्या निमित्तानं त्यांच्या कँप्टन आणि पल्सर या बैलांच्या अंगावर आम्ही साहेबांच्यासोबत अशी कलाकृती केली आहे. एका साईडला विठ्ठल आणि दुसऱ्या साईडला शरद पवार यांची छबी रेखाटली आहे. त्यावर आम्ही साहेबांच्या सोबत असे लिहिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.