Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुकानातून नूडल्स आणून खाल्ले, काही तासांतच बहिण-भावाचा झाला मृत्यू

दुकानातून नूडल्स आणून खाल्ले, काही तासांतच बहिण-भावाचा झाला मृत्यू 


सध्याच्या इन्स्टंट लाईफमध्ये आपल्याला सगळंकाही इन्स्टंट हवं असतं. त्यामुळे आपण बहुतेकदा फास्ट फूडला प्राधान्य देतो. हेच इन्स्टंट फूड दोन भावंडांच्या जीवावर उठलं. नूडल्स आणि पराठे खाल्ल्यानंतर बहीण-भावाचा मृत्यू झाला. हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यातील रहिवासी भूपेंद्र यांच्या घरी बुधवारी रात्री नूडल्स आणि पराठ्यांचा बेत होता. आईने नूडल्स बनवलेत म्हणून तीनही मुलं खूप आनंदात होती. मस्त जेवून सगळेजण शांत झोपले.

परंतु मध्यरात्री अचानक मुलांची तब्येत बिघडली. तिघांनाही इतकं अस्वस्थ वाटू लागलं की रात्रीच त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. भूपेंद्र यांनी रात्रीच तीनही मुलांना एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.

मात्र गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. 7 वर्षीय हेमा आणि 5 वर्षीय तरुणने आपला जीव गमावला. तर, 8 वर्षीय प्रवेशवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुलांच्या मृत्यूने आईची प्रकृतीही बिघडली आहे, रडून रडून तिची अतिशय बिकट अवस्था झाली आहे, तर वडील तिला कसेबसे सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

 मूल जन्मताच कर्मचाऱ्यांना मिळणार 5 लाख रुपये; 1 जुलैपासून नियम लागू या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. दोन्ही बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जे नूडल्स खाऊन मुलांची तब्येत बिघडली, ते जवळच असलेल्या नेहमीच्या दुकानातून खरेदी केले होते. आता या सर्व माहितीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.