Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बारमधून 59 जण ताब्यात !

बारमधून 59 जण ताब्यात !


पनवेल : कोन-आजिवली भागातील बिंदास (साई पॅलेस) या लेडीज बारवर नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली आहे. या प्रकरणात ३३ महिला वेटर, १९ ग्राहक तसेच बारमधील पुरुष वेटरसह एकूण ५९ जणांना ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबई शहरातील लेडीज बार ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ बार चालवले जात आहेत. तसेच अनेक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गैरकृत्य करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या हद्दीतील नियमभंग करणाऱ्या अशा बारवर कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. ३०) मध्यरात्री पनवेलच्या कोन आजिवली भागातील बिंदास (साई पॅलेस) या बार विहित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षने कारवाई केली आहे. तसेच अंगविक्षेप करणाऱ्या ३३ महिला वेटर, १९ ग्राहक तसेच त्यांना प्रोत्साहन देणारे ७ पुरुष वेटर, मॅनेजर अशा एकूण ५९ जणांना पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.