Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कडकनाथ आता विसरा 'या' कोंबड्या पाळा आणि 3 महिन्यात व्हा मालामाल!

कडकनाथ आता विसरा 'या' कोंबड्या पाळा आणि 3 महिन्यात व्हा मालामाल!


काही विशिष्ट पिकांचं उत्पादन घेऊन आज विविध राज्यांतील तरुण शेतकरीमंडळी लाखो रुपये कमवत आहेत. शेतीपूरक व्यवसायातूनही चांगलं उत्पन्न मिळवता येतं, हे अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. 'कुक्कुटपालन' हा त्यापैकीच एक व्यवसाय. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील चखेलाल गावचे रहिवासी राजू कुमार चौधरी यांचा देशी कोंबड्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते गौरविण्यातही आलं आहे. ते जवळपास 22 वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसायात आहेत.

त्यांच्याकडे विविध प्रकारच्या देशी कोंबड्या आहेत. त्यापैकी वनराजा आणि ग्राम प्रिया हे दोन प्रमुख प्रकार. राजू सांगतात, 'एक देशी कोंबडा तयार होण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागतो. 3 महिन्यात एक कोंबडा जवळपास 1 किलो वजनी होतो.

बाजारात देशी पिल्लांनादेखील मोठी मागणी असते. या कोंबडीच्या एका पिल्लाची 30 रुपयांना विक्री होते. तर पूर्ण तयार झालेल्या कोंबड्याला प्रति किलो 400 रुपये दराचा भाव मिळतो. महत्त्वाचं म्हणजे 10 हजार रुपये खर्चून कोणीही या व्यवसायातून 3 ते 4 महिन्यांत 40 हजार रुपये कमवू शकतात', अशी माहिती त्यांनी दिली.

त्याचबरोबर राजू असंही म्हणतात की, 'देशी कोंबड्या पालनाच्या तुलनेत सर्वसाधारण कुक्कुटपालन खर्चिक असतं. कारण देशी कोंबड्यांना दाणे द्यावे लागत नाहीत. त्यांना शेतात सोडल्यास त्या गवत खाऊन पोट भरतात. त्यामुळेच देशी कोंबड्यांच्या अन्नासाठी जास्त खर्च करावा लागत नाही.

तर सर्वसाधारण कुक्कुटपालनाचा सर्वाधिक खर्च हा कोंबड्यांच्या अन्नासाठी होतो.' राजू यांच्याकडे सध्या 600 कोंबडे आहेत. या कोंबड्यांचा एक भाग 1000 ते 1200 रुपयांना विकला जातो. कारण त्याला प्रचंड मागणी असते. म्हणूनच आजच्या तरुणांनी देशी कोंबडीपालन व्यवसायात करियर करण्यास हरकत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.