Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बस अपघातात 25 लोक जिवंत जळाले,' ' दुभाजक' ठरले अपघाताचे कारण

बस अपघातात 25 लोक जिवंत जळाले,' ' दुभाजक' ठरले  अपघाताचे कारण 


बुलढाण्यातून अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आलीये. बसमध्ये आग लागल्याने 25 प्रवासी जिवंत जळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस एका लग्नासाठी जात होती. तेव्हाच पावसामुळं बस रस्त्यावरुन घसरली.  या घटनेत बसचा डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागली. या दुर्घटनेत बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. 

25 प्रवाशांचा जागीच मृत्यू

डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. यात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ही बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही.

बस दुभाजकाला धडकली

दरम्यान, वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले. बस दुभाजकाला धडकली त्यावेळी समोरचा एक्सेल तुटला होता. समोरची चाक बस पासून वेगळी झाली होती. त्यानंतर आग लागली. या घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. 

बसमधील काही तरुणांनी फोडल्या काचा

काचा फोडून बाहेर आलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे. बस अपघातग्रस्त झाल्यानंतर बसमधील काही तरुणांनी काचा फोडल्या आणि ते बाहेर आले. त्यांनी काही प्रवाशांना बाहेर काढले. हा अपघात १.२६ मिनिटांनी अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

लोकांना बाहेर पडण्यासाठी नव्हता मार्ग

बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली. अनियंत्रित होऊन पुढं जाऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रिटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली. बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळं बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळं लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. त्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. बसमधून 25 मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. मात्र, त्यांची ओळख पटवणे अडचणीचे होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.