Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातील भारती सहकारी बँकेवर सायबर अटॅक; कार्ड क्लोन करून 1 कोटी हडपले

पुण्यातील भारती सहकारी बँकेवर सायबर अटॅक; कार्ड क्लोन करून 1 कोटी हडपले 


पुण्यातील भारती सहकारी बँकेवर सायबर अटॅक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सायबर चोरट्यांनी बनावट डेबिट कार्डचा वापर करत खातेदारांचे १ कोटी आठ लाख १५ हजार ७०० रुपये लंपास केले. मुंबई, पुणे, दिल्लीसह, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रातून हे पैसे लुटून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी बँकेचे कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. भारती सहकारी बँकेची मुख्य शाखा ही सदाशिव पेठेत आहे. ही बँक पुण्यातील मोठी सहकारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार डिसेंबर २०२० ते २०२१ दरम्यान राज्यातील विविध ठिकाणच्या एटीएममध्ये घडला आहे. सायबर चोरट्यांनी या कालावधीत बनावट डेबिट कार्ड (क्लोन) तयार केले.

त्यानंतर पुण्यातील सदाशिव पेठ, धनकवडी, धानोरी, आकुर्डी, कोथरुड, बाणेर, हडपसर, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, मुंबईतील वरळी, तसेच दिल्लीतील एटीएम केंद्रातून भारती सहकारी बँकेच्या खात्यातून तब्बल १ कोटी आठ लाख १५ हजार ७०० रुपये लंपास केले. ही बाब बँकेच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांनात धाव घेतली. दरम्यान, सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी ४३९ बनावट डेबिट कार्डचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बनावट एटीएम कार्डद्वारे १२४७ व्यवहार करण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

विशेष बाब म्हणजे अशीच एक घटना ऑगस्ट २०१८ मध्ये घडली होती. काॅसमाॅस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करुन काॅसमाॅस बँकेची एकूण मिळून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम सायबर चोरट्यांनी चोरून नेली होती. आता भारती सहकारी बँकेवर अशाच प्रकारे सायबर अटॅक झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.