Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार; 1 पोलिसांसह 4 जणांचा मृत्यू

जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार; 1 पोलिसांसह 4 जणांचा मृत्यू 


दहिसर ते मीरा रोडदरम्यान एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. तर या घटनेत एका पोलीसाचा देखील मृत्यू झाला आहे. जयपुर मुंबई पॅसेंजरमध्ये हा गोळीबार झाला आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


गोळीबार करणारे हल्लेखोर पसार झाले आहेत. पोलीस संपुर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. एक्स्प्रेसमधून मृतदेह बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आता पुढील प्रकिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. मृतांची ओळख पटवण्याचेही काम सुरु आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.