Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नारायण राणेचं मंत्रीपद जाणार, दिल्लीत शिक्कामोर्तब

नारायण राणेचं मंत्रीपद जाणार, दिल्लीत शिक्कामोर्तब 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काल पंढरपुर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यात निवडणुका आणि मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली असून केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

2024 च्या लोकसभेपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या विस्तारात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळण्याचा अंदाज असून यात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. यातच मंत्रिपद कुणाला द्यायचं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपच्या दोन मंत्र्यांना डच्चू देऊन शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे नारायण राणे यांना हा मोठा धक्का असणार आहे. तर शिंदे गटातील लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, भावना गवळी यांचं नाव चर्चेत आहे. याचसोबत प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांचं देखील नाव चर्चेत आहे. यातच एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्री पद मिळणार असून एक ग्रामीण तर एक शहरी भागाला देण्यात येणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.