Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गृहप्रवेशला हजर राहण्यासाठी रजा मिळाली नाही, 'या' उपजिल्हाधिकाऱ्यांनी थेट राजीनामाच दिला

गृहप्रवेशला हजर राहण्यासाठी रजा मिळाली नाही, 'या' उपजिल्हाधिकाऱ्यांनी थेट राजीनामाच दिला


छतरपूर : मध्य प्रदेशच्या प्रशासकीय विभागातून एक मोठी बातमी समोर येत आहे. छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर येथील उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. याचं कारण ऐकूण कुणालाही आश्चर्य वाटणार. गृहप्रवेश असल्यामुळे अधिका-यांनी घरी जाण्यासाठी सुट्टी न दिल्यामुळे आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बांगरे यांनी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला पत्रही पाठवले आहे.

पत्रामध्ये काय लिहिलं?

उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी पत्रात लिहिले आहे की, माझ्या घराच्या उद्घाटनाला (उद्घाटन) उपस्थित न राहिल्याने मी दुखावले आहे. उद्घाटन कार्यक्रमात जागतिक शांततेचे दूत बुद्ध यांच्या अस्थिकलशाचे दर्शन न दिल्यामुळे माझ्या धार्मिक भावनांना कधीही भरून न येणारी हानी पोहोचली आहे. त्यामुळे माझे मुलभूत हक्क, धार्मिक, श्रद्धा आणि घटनात्मक मूल्यांशी तडजोड करून उपजिल्हाधिकारी पदावर राहणे मला योग्य वाटत नाही. म्हणूनच मी आज, 22 जून 2023 रोजी उपजिल्हाधिकारी पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे.

कोण आहे निशा बांगरे

निशा बांगरे या मध्य प्रदेशातील प्रसिद्ध अधिकारी आहेत. छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगरमध्ये एसडीएम म्हणून कार्यरत होत्या. भारतीय संविधानाला साक्षीदार मानून त्यांनी लग्न केले होते. यासोबतच मध्य प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत निशा बांगरे बेतुलच्या आमला विधानसभेतून त्या निवडणूक लढवू शकतात. अशाची चर्चा सुरू होत्या. आता त्यांनी उपजिल्हाधिकारी पदावरुन राजीनामा दिल्याने पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

निशा बांगरे यांनी 2010-2014 मध्ये सम्राट अशोक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विदिशा येथून इंजिनीअरिंग केले. नंतर एका कंपनीत खाजगी नोकरी केली. परंतु काही काळानंतर, निशाने सिव्हिल सर्व्हंट बनण्याची तयारी सुरू केली आणि 2016 मध्ये मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) परीक्षेत यशस्वीरित्या डेप्युटी एसपी पद मिळवले.

इतकंच नाही तर २०१७ मध्ये निशा बांगरेने एमपीपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली. तेव्हापासून राज्य प्रशासकीय सेवेतील ही अधिकारी राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आपली सेवा देत होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.