Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"पुण्यात तरुणीवर कोयत्याने वार " देवेंद्र फडणवीस राजीनामा दया, राष्ट्रवादी आक्रमक

"पुण्यात तरुणीवर कोयत्याने वार " देवेंद्र फडणवीस राजीनामा दया, राष्ट्रवादी आक्रमक 


पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली असतांना आता पुण्यात आणखी एक घटना घडली आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेतील एका व्यक्तीने तरूणीवर दिवसा ढवळा कोयत्याने वार केल्याने आता राष्ट्रवादीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. पुण्याच्या वर्दळीचा ठिकाण असलेल्या सदाशिव पेठेत पेरूगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली आहे. पावन मारूती मंदिराजवळ तरूणी थांबली असता त्याठिकाणी हल्लेखोर तरूण आला. अन् त्याच्यात वाद घालण्यात सुरूवात केली. 

त्यानंतर तरूणीवर हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला करण्यास सुरूवात केली. परंतु त्याठिकाणाहून तरूणीनी पळ काढल्याने तिचा जीव वाचला. या घटनेवरून राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रचा बिहार करून टाकलाय देवेंद्र फडणवीसांनी अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. असं सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचा बिहार करून टाकलाय देवेंद्र फडणवीसांनी ..अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.