Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावधान! तुम्हीही कोल्ड्रिंक्स घेताय ? हा ' गंभीर ' आजार होऊ शकतो.....

सावधान! तुम्हीही कोल्ड्रिंक्स घेताय ? हा ' गंभीर ' आजार होऊ शकतो.....




आजकाल आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक घेणे नवे नाही. आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक्सचे प्रस्थ देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारण कुठलीही पार्टी असो सॉफ्ट ड्रिंक पाहिजेच. तसेच 'ड्रिंक्स' करतानाही सॉफ्ट ड्रिंकचा वापर होतो. मात्र, सॉफ्ट ड्रिंक्स एकदम डेंजर आहे. ते तुमच्या जीवावर उठू शकते. तसा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.  अर्थात सॉफ्ट ड्रिंक्सने कॅन्सरला निमंत्रण मिळत आहे. तसे संशोधनात पुढे आले आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही कोल्ड्रिंक्स घेणार का? याचा आताच विचार करा.

'सॉफ्ट ड्रिंक'मध्ये काय येते? 

सोडा आणि इतर अनेक कंपन्या ज्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या नावाखाली वेगवेगळ्या फ्लेवरचा सोडा विकतात. या सॉफ्ट ड्रिंकमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज, साखर आणि इतर कृत्रिम घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावरती अपाय होण्याची शक्यता वाढते. सोड्याच्या एका कॅनमध्ये जवळपास दहा वाट्या शुगर टाकलेली असते, जे एका अॅसिड इतकेच घातक आहे. त्यामुळे तुम्ही कधीतरी सोडा जरी घेत असाल तरी तुम्हाला या सेवनामुळे अपायच होणार आहे. तसेच लहान मुलांनाही कोल्ड्रिंक्स देऊ नका. याचा मुलांच्या आरोग्यावरही मोठा परिमाण होतो.

कोल्ड्रिंक्स पिणे, कॅन्सरला निमंत्रण

आता तर  ने धोक्याचा इशारा दिला आहे. संशोधनानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्ड्रिंक्स पिणे हे कॅन्सर सारख्या मोठा आजाराला निमंत्रण देणे आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आपल्याला तहान लागली की आपण सॉफ्ट ड्रिंक्सला प्राधान्य देतो. मात्र, ते धोकादायक असते. ज्यावेळी शरीराला पाण्याची गरज असते त्यावेळी पाणीच प्या. किंवा लिंबू सरबत, उसाचा रस, नारळ पाणी, लस्सी आदींचे सेवन करावे. यामुळे शरीराला कुठलीच हानी होत नाही. उलट फायदाच होतो. याबाबत डॉक्टरही सल्ला देतात.

मात्र, तुम्ही सातत्याने सॉफ्ट ड्रिंक्स घेत असाल तर अनेक आजार बळावतात. जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक्स हे कॉम्बिनेशन स्थूलता वाढवते. युवकांमध्ये सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोड्यामध्ये सर्वाधिक कॅलरीज असतात. ज्यांना शुगरचा त्रास आहे, त्यांना याचा जास्त धोका आहे. सॉफ्ट ड्रिंक्समुळे दात ठिसूळ होतात. हे थंड पेय आरोग्यासाठी घातक ठरत आहे. यामुळे हृदयाचे आजार, दाताचे आजार, लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. आता तर कॅन्सला आमंत्रण मिळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.