Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजयनगर १०० फुटी रोड वरील दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार हलवण्यास विरोध




 संजयनगर १०० फुटी रोड वरील दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार हलवण्यास विरोध  आयुक्त सुनील पवार यांना निवेदन  
गेली पंचवीस वर्षांपासून संजयनगर १०० फुटी रोडवर दर बुधवारी आठवडा बाजार भरतो यांचा उपयोग संजयनगर व जवळपासच्या हजारो नागरिकांना होतो.चिंतामणीनगर रेल्वे फुलाचे नवीन बांधकाम चालू आहे त्यामुळे माधवनगर सांगली रस्ता बंद करणेत आला आहे व ती वाहतूक संजयनगर मार्गे वळविण्यात आली आहे तरी
 
आता हा या वाहतुकीसाठी वर्षोनुवर्षे  फक्त बुधवारी भरणारा बाजार दुसरीकडे भरवण्याचे प्रशासनाच्या कडुन हालचाली चालू असल्याने समजते. पण ते नागरिकांच्या दृष्टीने  अतिशय गैरसोयीचे आहे. संजयनगर येथे वाहतुक वळविण्याच्या दूष्टीने अजुनही पर्यायी खुप रस्ते आहेत. त्याचा  वापर करण्यात येऊन योग्य ते  वाहतुकेचे नियोजन 
करावे‌. 

संजयनगर मधील १०० फुटी रस्त्यावरील बुधवार बाजार हलवण्यास स्थानिक नागरिक आठवडा बाजारातील सर्व विक्रेते यांचा विरोध आहे तरी यासाठी आयुक्त सुनील पवार यांना व जिल्हा पोलिस वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आले.  यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या मागणीचा विचार करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासित केले. यावेळी माजी नगरसेवक मा रमेशजी सर्जे , सतिशजी फोंडे,शिवाजी चोरमुले, गोविंदजी सरगर उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.