शहरातील नामवंत सराफ पेढीमध्ये चोरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास अटक
सांगली शहरातील एका नामांकित सराफी पेढीतील महिला कर्मचाऱ्याने पाच लाखांचे १४० ग्रॅम वजनाचे सोने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेली नऊ वर्ष झाले या संशयीत महिलेने दुकानातील सोने चोरत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या बाबत माहिती अशी की, याप्रकरणी पोलिसांनी नागश्री सुधीर टेंगले (रा. राणाप्रताप चौक, सांगलीवाडी ) हिच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सर्वच सराफ दुकानात कर्मचारी घरी जाताना त्यांची तपासणी करुनच सोडण्यात येते. अशा परिस्थितीत देखील या महिलेने पाच लाखांचे १४० ग्रॅम वजनाचे सोने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. मागील काही वर्षापासून संशयीत नागश्री टेंगसे या दुकानात कार्यरत आहेत. दि. २७ मार्च २०१४ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत दुकानातील इतरांची नजर चुकवून सोने चोरल्याचे उघड झाले आहे. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत,
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.