Breaking News

    Loading......

Sangli Darpan

Krushnakath News

पतीने पत्नीसह दोन मेहुण्यांची गोळ्या झाडून केली हत्या

पतीने पत्नीसह दोन मेहुण्यांची गोळ्या झाडून केली हत्या


दिवसेंदिवस देशात गुन्ह्यांच्या  घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत अल्पवयीन मुलीची तिच्या बॉयफ्रेंडने  अतिशय क्रूरपणे हत्या केली होती. त्या हत्येचा तपास सुरू असतानाच नुकतीच मुंबईतही एका व्यक्तिने त्याच्या लिव्ह इन पार्टनरने  हत्या केल्याच समोर आलं आहे. आता हरियाणातील हिस्सारमध्येही तिहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मेहुण्यांची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर तो मुलांना घेऊ घरातून पळून गेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पंडित नावाचा व्यक्ती हिसारच्या कृष्णा नगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतो. रविवारी घरगुती वादातून त्याने पत्नी आणि दोन मेहुण्यांवर गोळी झाडली. त्याने आपल्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने हा तिहेरी हत्याकांड घडवून आणलं. मनजीत सिंग, मुकेश कुमार आणि सुमन अशी मृतांची नावे असून धनना गावातील रहिवासी आहेत.

या प्रकरणी माहिती मिळताच अर्बन इस्टेट स्टेशन प्रभारी आणि चौकी प्रभारी हिस्सारहून 9-11 पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळ सील केले असून फौजफाटा तैनात केला आहे. पोलिस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी सांगितले की, ही घटना घरगुती वादातून घडली आहे. आरोपी प्रॉपर्टी डीलिंगचे काम करायचे.

घटनेनंतर आरोपी फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी आणि मेहुण्यांचा खून केल्यानंतर आरोपीही फरार झाला. आपल्या दोन मुलांना आणि एका मुलीला स्कूटीवर बसवून फरार झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली. दुसरीकडे, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तर, घराशेजारी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. डीव्हीआर तपासला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.