Breaking News

    Loading......

Sangli Darpan

Krushnakath News

अनिकेत कोथळे घटनेवेळी घटनास्थळी नसल्याचा बचाव पक्षाचा दावा तपासाधिकारी कूलकर्णी यांनी फेटाळला

अनिकेत कोथळे घटनेवेळी घटनास्थळी नसल्याचा बचाव पक्षाचा दावा तपासाधिकारी कूलकर्णी यांनी फेटाळला



सांगली दिं.१३: अनिकेत कोथळे याच्या खुनामध्ये युवराज कामटे याचा हात नाही. कोथळे याचा खून झाला तेव्हा कामटे तेथे हजर नव्हता असा बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेला दावा तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी आज फेटाळून लावला जिल्हा न्यायाधीश मलाबादे यांच्या न्यायालयामध्ये  तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांची बचाव पक्षाचे वकिल  अँड.विकास पाटील यांनी उलट तपासणी घेतली. आज दिवसभरात चाललेल्या उलट तपासणी दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेले सर्व दावे, तपास अधिकारी कुलकर्णी यांनी फेटाळून लावले या दरम्यान मुकुंद कुलकर्णी तसेच विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम यांच्याशी बचाव पक्षाचे वकील अँड. विकास पाटील यांची आज शाब्दिक चकमक उडाली.
  
 सरकार पक्षातर्फे जी कागदपत्रे जे पंचनामे पुरावे सादर झाले होते त्याला बचाव पक्षाचे अँड. पाटील यांनी आक्षेप घेण्याचे सत्र सुरू केले इतकेच नाही डीएनए अहवालावरही बचाव पक्षाच्या वकिलांनी संशय घेतला अनिकेत याच्या आई-वडिलांच्या डीएनए रक्ताचे नमुने घेतले मात्र अहवाल सादर करताना आईच्या रक्ताचे डीएनए जुळल्याने वडिलांच्या डीएनए चा अहवाल तज्ञानी दिला नाही असे तपास अधिकारी कुलकर्णी यांनी उलट तपासणी दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांना निक्षून सांगितले अहवालाबाबत घेतलेला संशय कुलकर्णी यांनी साफ नाकारला उलट डीएनए अहवालाबाबत जी प्रक्रिया राबवली गेली ती नियमानुसार होती असे सांगत कुलकर्णी यांनी बचाव पक्षाच्या वकिलांचे दावे फेटाळून लावले.
    
आंबोली येथे जो मृतदेह सापडला तो अनिकेत कोथळे याचा नव्हता जाळलेल्या ठिकाणाहून जमा केलेला पालापाचोळा केरोसिन डिझेल याचे पंचनामे अहवाल हा सारा बोगस प्रकार होता असा आक्षेप बचाव पक्षाच्या वकिलाने घेतला परंतु विशेष सरकारी वकील एडवोकेट उज्वल निकम तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी हे सर्व आक्षेप फेटाळून लावले इतकेच नाही तर आंबोली घाटात सापडलेला मृतदेह अनिकेत कोथळे यांचाच असल्याचे डीएनए अहवाला सह इतर सबळ पुरावा निशी सिद्ध झाल्याचे ठणकावून सांगितले.
  
 तपासा दरम्यान करण्यात आलेल्या पंचनामा बाबत त्याचप्रमाणे पंचांच्या तसेच तपास अधिकाऱ्यांच्या सहयांबाबत बचाव पक्षाने आक्षेप घेऊन सरकारी बाजू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो एडवोकेट निकम तपासा अधिकारी कुलकर्णी यांनी हाणून पाडला. अनिकेतचा खून केलेला नाही असा दावा ही बचाव पक्षाचे वकील अँड. पाटील यांनी केला परंतु अनिकेतचा पोलीस कोठडीत खून झाला तेथे युवराज कामटे हजर होता हे कुलकर्णी यांनी ठासून सांगितले  अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे पोलीस कोठडीतून पळून गेल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले परंतु दोघे पळून गेलेले नव्हते पोलीस कोठडीतच होते असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
   
 बचाव पक्षाच्या वकिलांनी तपास अधिकारी कुलकर्णी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला मात्र कुलकर्णी तसेच अँड निकम यांनी हा प्रयत्न हाणून पाडला यादरम्यान दोन्ही बाजूने शाब्दिक चकमकी घडल्या. उलट तपास अपूर्ण राहिला आहे ३ जुलै रोजी तपासाधिकारी कुलकर्णी यांची उलट तपासणी सुरू होणार आहे. यावेळी प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे , सीआयडी च्या पोलीस उपाधिक्षक आरिफा मुल्ला, पोनि मनोज बाबर यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.