अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा? मुख्यमंत्री पदच नव्हे तर देशही सोडणार?
लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेले एक ट्वीट आढळले. हे ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फोटोसह शेअर करण्यात आले होते ज्यात केजरीवाल हे दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंसह दिसत होते. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे या ट्वीटच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर येत्या काळात सरकारने न्याय न दिल्यास ते देश सोडण्याचा विचार करतील असे देखील त्यात म्हंटले होते. या ट्वीटसंदर्भात लाइटहाऊस जर्नालिज्मने केलेल्या तपासात संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर, AAP Rajasthan | Mission 2023 | Seats 150 – Parody ने शेअर केलेले ट्वीट व्हायरल होत आहे.
तपास: आम्ही गूगल किवर्ड सर्च करून यासंदर्भातील मीडिया रिपोर्ट्स शोधण्याचा प्रयत्न केला. अरविंद केजरीवाल यांचे कोणत्या कार्यक्रमातील हे विधान आहे का हे सुद्धा आम्ही तपासून पाहिले. पण आम्हाला अशी कुठलीच बातमी सापडली नाही, ज्यात अरविंद केजरीवाल कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ राजीनामा देतील असे सांगण्यात आले.
कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी जंतरमंतरला भेट दिली होती, ज्याविषयी अनेक बातम्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या आहेत पण कोणत्याही बातमीत अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख नाही.
आम्ही अरविंद केजरीवाल यांचे ट्विटर हँडलही तपासले. २९ एप्रिल २०२३ रोजी त्यांनी कुस्तीपटूंच्या निषेधाला पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरला भेट दिली होती तेव्हा आम्हाला त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ आढळला. व्हिडीओमध्ये कुठेही त्यांनी राजीनामा जाहीर केलेला नाही. तसेच ज्या ट्विटर हॅन्डल नि हा दावा केला त्याचे नाव होते, ‘AAP Rajasthan | Mission 2023 | Seats 150 – Parody’. नावानुसारच ट्विटर हँडल हे ‘पॅरडी’ अकाऊंट असल्याचे स्पष्ट झाले होते. हँडलने आपल्या बायोमध्ये असेही नमूद केले आहे की ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत आणि सर्व ट्वीट व्यंग्यात्मक आहेत.आम्ही आपचे प्रवक्ते देवेंद्र वानखेडे यांच्याशी देखील संपर्क साधला ज्यांनी आम्हाला कळवले की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे असे कोणतेही विधान नाही आणि हा दावा खोटा आहे. आम्ही इतर पक्षाच्या प्रवक्त्यांशी देखील संपर्क साधला ज्यांनी व्हायरल दावा नाकारला.
निष्कर्ष: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलक कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ राजीनामा देणार असल्याची घोषणा केली नाही. व्हायरल दावे खोटे आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.