Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चेन्नईतील नवविवाहित दाम्पत्य बालीमध्ये फोटो काढताना बुडाले ; 'स्पीड बोट'वर फोटो काढणं बेतलं जीवावर

चेन्नईतील नवविवाहित दाम्पत्य बालीमध्ये फोटो काढताना बुडाले ; 'स्पीड बोट'वर फोटो काढणं बेतलं जीवावर


नवी दिल्ली : चेन्नईच्या डॉक्टर दाम्पत्याचा बालीमध्ये हनिमूनसाठी गेले असताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दोघांचाही विवाह १ जून रोजी झाला होता. बालीमध्ये हनिमूनसाठी गेल्यानंतर स्पीड बोटवर फोटो काढणे त्यांच्या जिवावर बेतले आहे. या दरम्यानच दोघेही पाण्यात पडले आणि बुडाले. यामुळे या डॉक्टर दाम्पत्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूनमल्ली लोकेश्वरन आणि विबुष्णिया अशी या नवदाम्पत्याची नावं आहेत.

विबुष्णिया आणि पूनमल्ली या दोघांचा विवाह १ जून रोजी झाला. त्यानंतर हे दोघेही बाली या ठिकाणी हनिमूनसाठी गेले होते. तिथे वॉटर राईड करत असताना स्पीड बोटवर फोटो काढत होते. त्यावेळी या दोघांचीही तोल गेला आणि दोघेही पाण्यात पडले आणि बुडाले. या घटनेत या दोघांचाही मृत्यू झाला आहे. ही माहिती दोघांच्या कुटुंबांना मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या दोघांचेही कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बाली या ठिकाणी पोहचले आहेत.

विबुष्णिया ही पोटामल्लीला वास्तव्य करणाऱ्या सेल्वम यांची मुलगी होती. ती डॉक्टर होती. लोकेश्वरन आणि विबुष्णिया या दोघांचे प्रेम होते. दोघांनीही आपल्या प्रेमाविषयी आपआपल्या घरी सांगितले दोघांच्या घरुन होकार आला. त्यानंतर या दोघांचे लग्न १ जून रोजी झाले होते. थाटामाटात लग्न सोहळा पार पडल्यानंतर हे दोघेही हनिमूनसाठी इंडोनेशियाला गेले होते. वॉटर राईड करत असताना पाण्यात पडून दोघांचा मृत्यू झाला.

बाली येथील समुद्रात या दोघांनीही स्पीड बोट राईड घेतली. स्पीड बोटवर हे दोघे फोटो काढत होते. त्याचवेळी दोघांचाही अचानक तोल गेला. त्यानंतर दोघेही पाण्यात पडले. या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी म्हणजेच ९ जूनला लोकेश्वरनचा मृतदेह सापडला तर शनिवारी सकाळी विबुष्णियाचा मृतदेह सापडला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.