Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नात नाचताना गोळीबार, एकजण जखमी

लग्नात नाचताना गोळीबार, एकजण  जखमी


भाटशिरगाव (ता.शिराळा) येथे लग्नाच्या नाच गाण्याच्या कार्यक्रमात हवेत केलेल्या गोळीबारात एक जण दंडात गोळी लागून जखमी झाला. त्यास कोल्हापूर येथील सी.पार.आर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी (दि.२८) साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. या बाबतची माहिती ऋतिक दिलीप इंगळे यांनी दिली आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी ओंकार भगवान देसाई (वय २५) व संजय सखाराम देसाई फौजी (५२) यांना अटक करण्यात आली आहे.

या बाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भाटशिरगाव येथील देसाई वस्ती येथे अवधूत देसाई यांचे लग्न होते. लग्नानंतर नाच गाण्याचा कार्यक्रम होता. यावेळी ऋतिक दिलीप इंगळे त्याचा भाऊ अजय व नातेवाईक सनी कुंडलिक गायकवाड हे नाचगाणे पहाण्यासाठी आले असता संशयित आरोपी ओंकार देसाई हा रिव्हॉल्व्हर हातात धरून हवेत फायरिंग करत असताना अचानकपणे एक गोळी उडून ऋतिक इंगळे याच्या डाव्या दंडात घुसून आरपार गेली यात तो गंभीर जखमी झाला. त्यास प्राथमिक उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सी.पी आर.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.