Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टायटन पाणबुडी अपघातात मृत्यूमुखी पडलेले पाच प्रवासी, कुणी अब्जाधीश उद्योजक तर कुणी प्रशिक्षित डायव्हर

टायटन पाणबुडी अपघातात मृत्यूमुखी पडलेले पाच प्रवासी, कुणी अब्जाधीश उद्योजक तर कुणी प्रशिक्षित डायव्हर


टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट होऊत आतमधील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती US कोस्ट गार्डने दिली आहे. टायटॅनिक जहाजाचे अवशेष असलेल्या परिसरातच या पाणबुडीचे अवशेष आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर त्याची जगभरात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. त्यातही या पाणबुडीमध्ये बसलेल्या व्यक्तींची नावे पाहिल्यानंतर या प्रकरणाला मोठं वलय प्राप्त झाल्याचं दिसून येतं.

या पाणबुडीत स्वार झालेल्या पाच प्रवाशांमध्ये पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, अब्जाधीश व्यावसायिक हॅमिश हार्डिंग, फ्रेंच एक्सप्लोरर पॉल ऑनरी नार्जेलेट, तसंच या टूरचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रमुख स्टॉकटन रश यांचाही समावेश होता. पण या पाचही जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. शिवाय येथील बिकट परिस्थिती आणि प्रतिकूल वातावरण पाहता, ते सापडण्याची शक्यताही नाही, असं म्हटलं जात आहे. हे पाचही जण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज आणि प्रतिष्ठित म्हणून ओळखले जात. यापैकी कुणी अब्जाधीश होतं, तर कुणी मोठा उद्योगपती होतं. तर कुणी जगभ्रमंती करणारं एक्सप्लोरर होतं. या लेखात आपण त्या सर्वांविषयी 

सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू -

स्टॉकटन रश 61 वर्षीय स्टॉकटन रश हे ओशियनगेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते प्रवास करत असलेली पाणबुडीची टायटॅनिक टूर ही ओशियनगेट कंपनीकडूनच आयोजित करण्यात येते. स्टॉकटन हे एक अनुभवी इंजिनिअर होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी एका प्रायोगिक विमानाचंही डिझाईन तयार केलं होतं. तसंच इतर पाणबुड्या बनवण्याचाही अनुभव त्यांना होता.

रश यांनी ओशियनगेट कंपनीची स्थापना 2009 मध्ये केली. समुद्राच्या खालील जगाचं दर्शन घेण्याची इच्छा असलेल्या लोकांना पाणबुडीची सोय कंपनी करून द्यायची. टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासंदर्भातली टूर 2021 मध्ये सुरू केल्यानंतर ओशियनगेट कंपनीची मोठी चर्चा झाली होती.

प्रत्येक प्रवाशाला अडीच लाख डॉलर म्हणजेच जवळपास दोन कोटी रुपयांचं तिकिट या प्रवासासाठी ठेवण्यात आलेलं होतं. या टूरमध्ये प्रवाशांना तब्बल 8 तास पाण्याखाली घालवून 595 किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना त्यांना या रकमेचं समर्थन केलं होतं. या टूरसाठी लागणारा खर्च पाहता आम्ही ठेवलेला दर हा योग्य असल्याचं मत स्टॉकटन यांनी नोंदवलं होतं.

2017 मध्ये प्रिन्सटन युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर एक लेख छापण्यात आला होता. तिथूनच त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. या लेखात सांगण्यात आलं होतं की टायटन पाणबुडीच्या प्रत्येक टूरमध्ये स्टॉकटन रश हे सोबत जात असतात. स्टॉकटन रश यांचा विवाह वेंडी रश यांच्यासोबत झालेला आहे. त्यांना ईसाडोर आणि ईडा स्ट्रॉस नावाची दोन नातवंडंही आहेत.

हॅमिश हार्डिंग

58 वर्षीय हॅमिश हार्डिंग हे युकेमधील एक मोठे उद्योजक मानले जातात. ते दुबईमध्ये अक्शन एव्हिएशन नामक एक कंपनी चालवलायचे. या माध्यमातून ते विविध ठिकाणांना भेटी देत असत. हॅमिश यांनी दक्षिण ध्रुवाला अनेकवेळा भेट दिली होती. अंतराळवीर बझ एल्ड्रिन यांच्यासोबत त्यांनी 2022 मध्ये एकदा हा प्रवास केला होता.

हॅमिश हार्डिंग यांच्या नावे एका गिनिच वर्ल्ड रेकॉर्डचीही नोंद आहे. यामध्ये त्यांनी मरियाना गर्ता परिसरात डुबकी घेऊन पाण्याखाली सर्वाधिक वेळ डाईव्ह करण्याचा विक्रम नोंदवला होता. 2022 मध्ये बिझनेस एव्हिएशन मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की त्यांचं बालपण हाँगकाँगमध्ये गेलं. त्यांना लहानपणापासूनच पायलट बनायचं होतं. 1980 मध्ये केंब्रिज विद्यापीठात शिकत असतानाच ते पायलट होण्यासाठीच्या परीक्षेत पास झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ बँकिंग सॉफ्टवेअर व्यवसायात घालवला. पुढे त्यांनी स्वतःची विमान निर्मिती कंपनी सुरू केली होती.

खरं तर गेल्या वर्षी जून महिन्यातच हॅमिश यांना पाणबुडी सफरीवर जायचं होतं. गेल्या वेळी त्यांच्या डाईव्हदरम्यान पाणबुडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यास विलंब होत होता. त्यावेळी पाणबुडीला प्रवासादरम्यान काही इजा झाली होती. पण या घटनेत कोणताच प्रवासी जखमी झालेला नव्हता. नवनवीन ठिकाणांना भेट देण्याच्या त्यांच्या उत्सुकतेबद्दल ते म्हणायचे, "मला वाटतं या सगळ्या धोक्यांबाबत विचार झालेला आहे, मी जे करतोय त्याची मला पूर्ण कल्पना आहे."

गेल्या आठवड्यातही पाणबुडी टूरवर जाण्यापूर्वी हॅमिश हार्डिंग यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ते म्हणाले, "पाणबुडीची ही मोहीम 2023 मधली पहिली आणि कदाचित शेवटची असू शकेल. कारण न्यूफाऊंडलँडमध्ये वातावरण खराब आहे, प्रचंड थंडी पडलेली असल्यामुळे पुन्हा ही टूर होईल याची शक्यता नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. हॅमिश हार्डिंग यांच्या निधनानंतर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांच्यावर श्रद्धांजली वाहणारे अनेक संदेश देण्यात येत आहेत.

शहजादा दाऊद आणि सुलेमान दाऊद

शहजादा दाऊद हे पाकिस्तानातील एका प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबातील सदस्य आहेत. ते ब्रिटनमध्ये प्रिन्स ट्रस्ट चॅरिटी बोर्डाचे सदस्यही आहेत. पाणबुडीमध्ये शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद दोघेही स्वार झाले होते.

दाऊद 48 वर्षांचे आहेत आणि त्याचा मुलगा 19 वर्षांचा आहे.

पाकिस्तानी वंशाचे असलेले शहजादा दाऊद सध्या ब्रिटनमध्ये राहतात. त्यांचं कुटुंब ब्रिटनच्या सरे भागात राहतं. दाऊद यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, "शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान यांच्या संपर्क तुटल्यानंतर त्यांच्याविषयी जास्त काही माहिती मिळू शकली नाही. सध्या तरी पाणबुडीशी पुन्हा संपर्क साधण्याचा आणि त्यांना सुरक्षितपणे परत घेऊन येण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक सरकारी संस्था आणि खोल समुद्रात शोधमोहिमा राबवणाऱ्या कंपन्यांची यासाठी मदत घेण्यात येत आहे."

दाऊद परिवार हा पाकिस्तानातील धनाढ्य कुटुंबांपैकी एक आहे. पण ब्रिटनशी त्यांचं जवळचं नातं आहे. शहजादा दाऊद हे अग्रो कॉर्पोरेशन कंपनीचे व्हाईस चेअरमन आहेत. ही कंपनी खते, अन्नधान्य आणि ऊर्जा क्षेत्रात काम करते. ब्रिटिश माध्यमांच्या माहितीनुसार, शहजादा दाऊद यांचा जन्म पाकिस्तानात झाला, पण पुढे ते युकेत स्थायिक झाले. तिथे त्यांनी बकिंगहॅम युनिव्हर्सिटीतून कायद्याचं शिक्षण घेतलं. यानंतर फिलाडेल्फिया विद्यापीठातून ग्लोबल टेक्सटाईल मार्केटिंग विषयात एमएससी केलं. शहजादा दाऊद हे 'सेटी' नामक अंतराळ संशोधन कंपनीचे ट्रस्टीही आहेत. त्यांच्याशी संबंधित काही माहिती या संस्थेच्या वेबसाईटवरही आहे.

पॉल हेन्री नार्जिओलेट

फ्रेंच नेव्हीमध्ये डायव्हर म्हणून कधीकाळी कामास असलेले पॉल (वय 77) हेसुद्धा पाणबुडीत स्वार होते. टायटॅनिक या टोपणनावाने ते प्रसिद्ध होते. इतर कोणत्याही एक्सप्लोररपेक्षा जास्त काळ टायटॅनिकच्या अवशेषांची पाहणी त्यांनीच केली होती, असं म्हटलं जातं.

टायटॅनिकचे अवशेष पाहण्याचे पहिले प्रयत्न झाले तेव्हा म्हणजेच 1987 मध्येही ते या मोहिमेत सहभागी होते. टायटॅनिकच्या अवशेषांवर संशोधन करणाऱ्या कंपनीचे ते संचालक होते. या कंपनीच्या माहितीनुसार, "नार्जिओलेट यांनी टायटॅनिकच्या अवशेषांमधून बाहेर काढलेल्या हजारो वस्तूंचं निरीक्षण केलेलं होतं." त्यांच्या परिचितांपैकी एक असलेले मॅथ्यू जॉन म्हणतात, "ते संपूर्ण फ्रान्ससाठी सुपर हिरो असतील."



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.