Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना; ६ जणांचा जागीच मृत्यू, १५ जण जखमी

जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना; ६ जणांचा जागीच मृत्यू, १५ जण जखमी


त्रिपुरा:  जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्रिपुरातील कुमारघाट येथे भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान वीजेच्या धक्क्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान मिरवणूक सुरु असताना रथ एका उच्च दाबाच्या वीज तारेच्या संपर्कात आला. यामुळे करंट पसरला आणि त्याच्या धक्क्याने ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पंधराहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी अग्निशमन दलासही घटनास्थळी धाव घेतली. हा रथ १३३ केव्ही ओव्हरहेड केबलच्या संपर्कात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमके काय घडले ?

त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट येथे भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा मोठ्या उत्सहाता काढण्यात आली होती. त्यादरम्यान, काल बुधवारी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. यावेळी लोखंडाने बनलेला हा रथ हजोर भाविक आपल्या हाताने खेचत होते. याचदरम्यान, लोखंडाचा हा रथ रस्त्यातील हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला. यामुळे वीज रथात उतरली आणि अनेक जणांना वीजेचा धक्का बसला. यात ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.