Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताच्या हाती लागलंय नव्या खजिन्याचं भांडार!

भारताच्या हाती लागलंय नव्या खजिन्याचं भांडार! 


देशाच्या हातात एक महत्त्वाचा खजिना लागला आहे. आता तुम्ही विचार करत असणार हा खजाना नेमका कोणता? हा खजाना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 30 महत्त्वाची खनिजे आहेत. जी भारतातील प्रमुख क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या खनिजांमुळे केवळ आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहे. या खनिजांसाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. मंत्रालयाने जारी केलेल्या खनिजांच्या यादीत अनेक खनिजे मौल्यवान असल्याची माहीती समोर आली आहे.

समितीचा अहवाल प्रसिद्ध करताना केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, ही यादी वेळोवेळी अपडेट केली जाईल. या आधारे खनिजांची ओळख आणि त्यांचे उत्खनन करण्याचे काम पुढे नेले जाईल. नोव्हेंबर 2022 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील 7 सदस्यीय समितीने हा अहवाल तयार केला आहे. केंद्रीय मंत्री जोशी यांनी माहिती दिली की भारताने प्रथमच महत्त्वाच्या क्षेत्रांच्या गरजा लक्षात घेऊन महत्त्वाच्या खनिजांची सर्वसमावेशक यादी ओळखली आहे.

कोणती खनिजं आहेत?

मंत्रालयाने जारी केलेल्या खनिजांच्या यादीमध्ये लिथियम, मॉलिब्डेनम, निओबियम, निकेल, पीजीई, टॅंटलम, टेल्युरियम, टिन, टायटॅनियम, टंगस्टन, व्हॅनेडियम, अँटिमनी, बेरिलियम, बिस्मथ, कोबाल्ट, तांबे, गॅलियम, जर्मेनियम, ग्रेफाइट यांचा समावेश आहे. इंडियम, फॉस्फरस, पोटॅश, रे, रेनियम, सिलिकॉन, स्ट्रॉन्टियम, झिरकोनियम, सेलेनियम आणि कॅडमियम.

ज्या खनिजांची यादी जारी करण्यात आली आहे ती खनिजे आर्थिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. यामध्ये ग्रेफाइट, टायटॅनियम आणि कोबाल्टसारख्या खनिजांचा वापर दूरसंचार तसेच इलेक्ट्रॉनिक्स, वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रात केला जातो. याशिवाय उपग्रहांच्या निर्मितीमध्येही टायटॅनियमचा वापर केला जातो. ही खनिजे संरक्षण उपकरणांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.