Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लव्ह पाकिस्तान फुग्यांचे मुंबई कनेक्शन शोधा, सूत्रधाराला अटक करा

लव्ह पाकिस्तान फुग्यांचे मुंबई कनेक्शन शोधा, सूत्रधाराला अटक करा


लव्ह पाकिस्तान फुग्यांचे मुंबई कनेक्शन शोधा, सूत्रधाराला अटक करा होटगी रस्त्यावरील ईदगाह मैदानावर 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे विकणाऱ्या दोन मुलांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. या प्रकरणाचे मुंबई कनेक्शन दिसून येत आहे. या मुंबई कनेक्शन चा शोध लावून मुख्य सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी शुक्रवारी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडे केली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी आणि इतर नेत्यांनी पोलीस उपायुक्त का यांची भेट घेतली. पोलिसांनी फुगे विकणाऱ्या दोन मुलांना अटक केल्यानंतर हे फुगे ज्या व्यापाऱ्यांकडून खरेदी केले त्या व्यापाऱ्यालाही अटक केली. या व्यापाऱ्याने मुंबईतील व्यापाऱ्यांकडून फुग्यांची खरेदी केली होती. पोलिसांनी हे मुंबई कनेक्शन शोधून काढावे. शहराची शांतता भंग करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.

मुस्लिम बांधवांचे आभार

फुगे विकणाऱ्या दोन मुलांना एमआयएमचे नेते रियाज सय्यद यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सय्यद यांच्यामुळेच हा प्रकार उघड झाला. सोलापूरची शांतता अबाधित राहावी यासाठी रियाज सय्यद यांनी प्रयत्न केले. त्याबद्दलही आम्ही सय्यद यांचे आभार मानतो असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.