"आम्ही वऱ्हाडी म्हणून येतो., लग्न करून टाका, अजून वेळ गेली नाही" लालूप्रसाद यादवांचा या सल्लाने एकच पिकला हशा
पाटणा: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आणि भाजपाला देशात रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. यासाठी काल (शुक्रवारी) 15 भाजप विरोधी पक्ष पाटणा येथे एकत्र आले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक सुमारे साडेचार तास चालली. नितीश यांना महाआघाडीचे समन्वयक बनवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे, मात्र पुढील बैठकीत निर्णय होणार आहे. पुढील बैठक 10 ते 12 जुलै दरम्यान शिमल्यात होणार आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ही घोषणा केली. पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, सर्व पक्षांनी एकत्र लढण्याचे मान्य केले आहे. पुढील बैठकीत पुढील बाबींवर निर्णय घेतला जाईल. शिमल्यात युतीचे नाव, समन्वयक आणि जागावाटपाचा फॉर्म्युला यावर चर्चा होणार आहे.मात्र यावेळी माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी राहुल गांधींना दिलेल्या सल्लामुळं मंचावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
अजून वेळ गेली नाही, लग्न करून टाका.
विरोधकांनी बैठक पार पडल्यानंतर पत्रकार पत्रकार परिषदे घेण्यात आली. यावेळी राहुल गांधींना लग्न करण्याचा मिश्किल सल्ला लालूप्रसाद यादव यांनी दिला. यावेळी नितीशकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींनी लांब दाढी वाढवल्याचं निदर्शनास आणून दिलं. यानंतर लालू प्रसाद म्हणाले की, "आता राहुल गांधींनी दाढी ट्रिम करण्याची वेळ आली आहे. तसेच अजून वेळ गेली नाही, लग्न करून टाका., आम्ही वऱ्हाडी म्हणून सर्वंजण लग्नाला येऊ" असं लालूप्रसाद यादव म्हणाले. यावेळी मंच्यावर उपस्थित असलेल्या नेत्यांना हसू आवरता आले नाही. त्यामुळं वातावरण झाले हलकेफुलके व आनंदी झाले.
कोण-कोण नेते होते उपस्थित
विरोधी पक्षाच्या बैठकीत जेडीयूचे नितीश कुमार, लालन सिंह, संजय झा यांच्याशिवाय मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, आरजेडीचे लालू यादव, तेजस्वी यादव, मनोज झा, राष्ट्रवादीचे शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सीपीएमचे सीताराम येचुरी आदी उपस्थित होते. , सपकडून अखिलेश यादव, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, यूबीटीकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत, जेएमएमकडून हेमंत सोरेन, टीएमसीकडून ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, डीएमकेकडून एमके स्टॅलिन, टीआर बालू, अरविंद केजवाल. आप, भगवंत मान, संजय सिंग, राघव चढ्ढा, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, सीपीआयचे डी राजा, सीपीआय एमएलचे दीपंकर भट्टाचार्य आणि इतर नेते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.