Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ट्रक ड्रायव्हर'नंतर राहुल गांधी बनले 'मेकॅनिक'

'ट्रक ड्रायव्हर'नंतर राहुल गांधी बनले 'मेकॅनिक'


नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा काही दिवसापूर्वी ट्रक ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांचा आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राहुल गांधी मेकॅनिक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींनी फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी रोज नव्या भूमिकेत सर्वांसमोर येत आहेत. राहुल गांधी मंगळवारी दिल्लीतील करोल बाग परिसरात असलेल्या एका बाजारपेठेत गेले होते.

बाजारपेठेत जाताच बरोबर राहूल गांधींना नागरिकांनी घेराव घातला आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करू लागले. यावेळी राहुल गांधींनी गॅरेजमध्ये जात मॅकेनिकसोबत संवाद साधला. इतकेच नाहीतर राहुल गांधींनी आपल्या हाताची कमाल दाखवत तेथील दुचाकीवर स्क्रू ड्राव्हर चालवला. राहुल गांधींनी या सर्व घटनेची माहिती आपल्या इंस्टाग्रामवर दिली आहे.

मॅकेनिकसोबत काम करत असल्याचा राहुल गांधींचा एक फोटो इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. या फोटोला इंस्टाग्रामवर राहुल गांधींनी एक कॅप्शन दिले आहे. पाना फिरवणाऱ्या आणि भारताची चाके फिरवणाऱ्या हातांकडून शिका, अशा प्रकारचे कॅप्शन राहुल गांधींनी दिले आहे. दरम्यान, त्यांच्या या फोटोला हजारो युझर्सने लाईक आणि कंमेंट केल्या आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.