Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जवळ बिबट्याचे दर्शन, नागरिकांचा पाठलाग केल्याची घटना वन विभाग सतर्क

सांगली जवळ बिबट्याचे दर्शन, नागरिकांचा पाठलाग केल्याची घटना वन विभाग सतर्क 


सागंली : सांगलीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळमध्ये सोमवारी रात्री बिबट्याने तिघांचा पाठलाग केल्याची घटना घडली असून वन विभागाने या परिसरात गस्त सुरू केली आहे. रात्रीच्यावेळी शेतीला पाणी देण्यासाठी जात असताना अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले.

धनंजय जाधव हे रात्री नऊ वाजताच्या सुमारास रानातील वस्तीवरून गावात येत असताना रस्त्याकडेला बसलेला बिबट्या त्यांना दिसला, त्याने काही अंतरही दुचाकीमागे धाव घेतली. ही बाब जाधव यांनी ग्रामपंचायत सदस्य रवि पाटील यांना भ्रमणध्वनीवरून कळवली. त्यानंतर गावातील दोन तरूण घटनास्थळी पोहचले असता, त्यांनाही बिबट्याचे दर्शन तर झालेच पण त्याने पाठलाग केला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सदरची घटना तात्काळ वन विभागाला कळविण्यात आल्यानंतर वन कर्मचार्‍यांनी गावात धाव घेउन पाहणी केली. बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्याने भीतीचे वातावरण असून गावातील तरूणांनी गस्त सुरू केली आहे. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनीही धाव घेऊन बिबट्याच्या पाउलखुणा आढळतात का याची पाहणी केली. मात्र, पाऊस झाल्याने ठसे आढळले नाहीत. गावकर्‍यांना विशेषत: मळ्यात वास्तव्य करणार्‍यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.