Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल 



महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संशयित मोहन अग्रवाल यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात परतूर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका 36 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

परतूर शहरातील एका 36 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संशयित मोहन अग्रवाल व त्यांची दोन मुले कृष्णा अग्रवाल व तेजस अग्रवाल हे 22 जून रोजी रात्री बारा वाजता महिलेच्या घरी गेले. तुमचा मुलगा कुठे आहे, अशी त्यांनी विचारणा केली. तो घरी नसल्याचे महिलेने सांगितले. दरम्यान यावेळी मोहन अग्रवाल यांनी फिर्यादीच्या पतीला धक्काबुक्की केली. शिवाय, फिर्यादीच्या हातावर लोखंडी रॉड मारला. फिर्यादीच्या भाचीचा हात धरून तिला ओढले. तुझ्या मुलाला बोलावले नाही तर ठार मारू, अशी धमकी त्यांनी दिली. सदरील महिलेच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसात संशयित आरोपी मोहन अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, तेजस अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोहन अग्रवाल यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना, मोहन अग्रवाल यांच्या मुलाच्या तक्रारीवरून देखील एकूण सहा लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परतूर शहरातील एका लॉजसमोर तेजस मोहन अग्रवाल हे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता आपले रेस्टॉरंट बंद करून जात होते. त्याचवेळी एकूण 6 संशयित आरोपींनी त्यांना मारहाण केली. तुझ्याकडचे पैसे दे, अशी मागणी त्यांनी केली. तेजस यांनी नकार देताच त्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व गळ्यातील पाच तोळ्यांची चेन काढून घेऊन संशयित फरार झाले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'तू तुझ्या नवऱ्याकडून घटस्फोट घे, आपण दोघे लग्न करू,' असे म्हणून प्रियकराने प्रेयसीला घटस्फोट घ्यायला लावला. नंतर मात्र, लग्न करण्यास नकार दिला. तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली. महिलेच्या फिर्यादीवरून प्रवीण राठोड या संशयिताविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.