दारूने फक्त लिव्हरच का खराब होतो इतर अवयव का नाही?
लिव्हर हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपलं पूर्ण शरीर त्यावर अवलंबून असतं. त्यामुळे आपलं लिव्हर हेल्थी असणं खूप गरजेचं असतं. पण बहुतेक लोकांना दारूचे व्यसन असते त्यामुळे त्यांना लिव्हरशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसंच जास्त दारू पिल्यामुळे लिव्हर खराबही होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की शरीरातील बाकीचे अवयव सोडून दारूमुळे लिव्हरच का खराब होते? बहुतेक लोकांना याबाबत माहिती नसेल. तर आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.
आपण जेही अन्न खातो मग ते हेल्थी असो किंवा अनहेल्थी असो ते अन्न आपल्या लिव्हर पर्यंत जाऊन पोहोचतं. तिथेच विटॅमिन आणि हार्मोनच्या रिसायकलिंगचं काम होतं. तसंच लिव्हर आपल्या शरीरातील हानिकारक तत्त्वांना पूर्णपणे साफ करत असतो. लिव्हरची एक खासियत असते ती म्हणजे आपण जेवण केल्यानंतर एक्स्ट्रा शुगरला ते स्वतः जवळ ठेवते आणि जेव्हाही शरीरात अशक्तपणा जाणवतो तेव्हा ते ग्लुकोज देते.
दारूचा दुष्परिणाम लिव्हरवर का होतो?
दारूचा एक घोटही तुमच्या शरीराला नुकसान पोहचवू शकतो. दारू पोटात गेल्यानंतर ती गॅस्ट्रीक एसिडला त्रास देते. तसंच जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त दारू पिलात तर तुमच्या पोटावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो. लिव्हर तुमच्या शरीराला डिटॉक्सीफाई करते. त्याचबरोबर जर तुम्ही सारखी दारू प्यायलात तर तुमचे लिव्हर फॅट समजून दारूच साठवून ठेवते. त्यामुळे दारूमुळे तुमचे लिव्हर खराब होते. लिव्हर सोबतच दारू शरीरातील अन्य अवयांवरही परिणाम करते. रोज दारू पितात त्या लोकांना अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे जर दारूचे व्यसन सोडले तर या आजारांपासून स्वतःचं संरक्षणही करता येतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.