नक्षलवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या, मृतदेहावर सापडले धमकीचे पत्र
छत्तीसगढमध्ये नक्षवाद्यांनी भाजपच्या एका नेत्याची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकला आहे. काका अर्जून असे त्या नेत्याचे नाव असून ते माजी सरपंच देखील होते. काका अर्जून यांच्या मृतदेहावर नलक्षवाद्यांनी एक पत्र देखील ठेवले असून त्यात त्यांनी काका अर्जून यांना दिलेल्या धमकीचा उल्लेख केला आहे.
काका अर्जून हे गेल्या काही वर्षांपासून छत्तीसगढमधील भाजपमध्ये सक्रीय होते. ते सरपंच म्हणून देखील निवडून आले होते. तेव्हापासून त्यांना सतत नक्षलवाद्यांकडून राजकारण सोडण्याच्या धमक्या येत होत्या. मात्र काका अर्जून यांनी नक्षलवाद्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची निर्घृणपणे हत्या केली. नक्षलवाद्यांनी त्यांच्या मृतदेहावर एक चिठ्ठी ठेवली आहे. 'राजकारण सोडण्यासाठी यांना सतत इशारे देऊनही ते ऐकत नसल्याने त्यांची हत्या करण्यात आली आहे. यापुढेही जो कुणी आमच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करेल त्यांची तशीच अवस्था केली जाईल', अशी धमकीच नलक्षवाद्यांनी दिली आहे.
गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांकडून छत्तीसगढमध्ये चार भाजप नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'काँग्रेसच्या मदतीशिवाय अशा हत्या होणे शक्यच नाही. या सर्व राजकीय हत्या आहेत', असा आरोप छत्तीसगढ भाजपचे सचिव ओपी चौधरी यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.